Sushama Andhare On BJP Leaders | भाजपकडून जाणूनबुजून अवमानकारक वक्तव्ये, त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे; सुषमा अंधारेंची भाजपवर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sushama Andhare On BJP Leaders | शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपला फक्त गोळवलकर आणि हेगडेवार हवे आहेत, बाकी महापुरूष नको, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. मंगळवारी पुण्यात राज्यपालांनी शिवाजी महाराजांविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात बंद पाळण्यात आला. या बंदादरम्यान, मूक मोर्चा काढण्यात आला. सुषमा अंधारे या मूक मोर्चाला उपस्थित होत्या. (Sushama Andhare On BJP Leaders)

 

पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता हा मोर्चा सुरु झाला. त्यानंतर लोकमान्य टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेची मूक मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार होते. तसेच गणेश मंडळांनीही पाठिंबा दिला होता. (Sushama Andhare On BJP Leaders)

 

कार्यक्रमाच्या वेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘भाजपच्या नेत्यांकडून जाणूनबुजून महारपुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत.
त्यांना फक्त गोळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरूष नकोत.
भाजपाला ऐकायचं नसेल तर आम्ही असं समजू की भाजप महापुरूषांच्या विरोधात आहे.
१७ मार्चला आमचा सर्वपक्षीय मोर्चा मुंबई येथे आहे. आम्ही सर्व महापुरूषांच्या सन्मानार्थ एकत्र येणार आहोत.
पुण्यातून या बंदला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.’

 

Web Title :- Sushama Andhare On BJP Leaders | bjp only wants golwalkar hedgewar not other great men criticism of sushma andhare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil On Eknath Khadse | ‘एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या’ – गुलाबराव पाटील

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात…’ – संजय राऊत

Munmun Dutta | …म्हणून अभिनेत्री मुनमून दत्ता फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर भडकली