Sushant Singh Rajput | सुशांत सिंग आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे कारण आले समोर; एका सिनवरुन 6 वर्षांचे रिलेशन संपवले

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या जाण्याने चाहत्यांसह सर्व कलाकारांच्या मनाला चटका लावून गेलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याला अजूनही कोणी विसरू शकलेले नाही. आज (दि.14) अभिनेता सुशांतच्या दुर्दैवी मृत्यूला 3 वर्षे झाली आहेत. त्याच्या मृत्यूचे गुढ अद्याप उलगडलेले नाही. सुशांतच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला होता त्याचप्रमाणे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला सर्वांत जास्त धक्का बसला होता.

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेची (Actress Ankita Lokhande) ओळख सुप्रसिद्ध ‘पवित्र रिश्ता’
(Pavitra Rishta) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून झाली. त्यांच्या पडद्यावरील जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले तसेच खऱ्या आयुष्यातही त्यांच्या मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. ते तब्बल 6 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहिले. सुशांत आणि अंकिताची (Sushant And Ankita) जोडी फार लोकप्रिय होती. सुशांतने ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhhla Jaa) या एका रिअलिटी शोमध्ये अंकिताला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. व अंकितानेही होकार दिला होता. ते दोघे लग्न देखील करणार होते. मात्र चित्रपटातील एका सिनमुळे अंकिता आणि सुशांतचे 6 वर्षाचे नाते तुटले.

सुशांतने आपल्या करिअरचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. त्याचे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सोबत
‘शुद्ध देसी रोमांस’ (Shuddh Desi Romance ) चित्रपटाचे शुटिंग चालू होते.
अंकिताला सुशांत आणि परिणीतीची जवळीक खटकत होती. यावर दोघांमध्ये खटके उडू लागले.
चित्रपटातील सीन करता सुशांत आणि परिणीती चोप्राने ऑनस्क्रीन लिपलॉक किस केले होते.
ही गोष्ट अंकिताला अजिबात आवडली नव्हती.
सुशांतच्या एका मित्राने दिलेल्या मुलाखतीनुसार सुशांतने परिणीतीला असे मोठ्या पडद्यावर किस केल्याने
अंकिता नाराज होती. शुद्ध देसी रोमान्स चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे को-स्टार दोन वर्षे विजानच्या ऑफिसमध्ये
भेटत होते. हे अंकिताला आवडत नव्हते. यामुळे अंकिताने एकदा स्टुडिओ कॅन्टीनमध्ये सुशांत सिंग राजपुतला
कानाखाली मारली होती.

अंकिता सुशांतच्या बाबतीत अतिसंशयी होती. तिला सुशांतचे असे इतर हिरोईनसोबतचे चित्रपटातील सिनदेखील आवडत नव्हते. अनेकदा सुशांतने अंकिताची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला होता.
मात्र तरीही अंकिताचे आणि त्याचे एकमत झाले नाही. आणि दोघांनी 6 वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतला (Sushant Singh Rajput Death) देवाघरी जाऊन तीन वर्षे लोटली आहेत.
सुशांतच्या मृत्यूमागचे कारण आजपर्यंतही समजलेले नाही. पवित्र रिश्ता बरोबरच सुशांतने अनेक हिट चित्रपट
दिले आहेत. आज त्याचे अनेक चाहते त्याची आठवण काढत आहेत. (Sushant Singh Rajput)

Web Title :  Sushant Singh Rajput | sushant singh rajput and ankita lokhande broke up because of this person their relationship of 6 years broke due to a selfie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)