Sushma Andhare | दीपाली सय्यद यांचा टीकेला सुषमा अंधारे यांनी दिले उत्तर, म्हणाल्या – ‘पहिला डाव भुताचा म्हणून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनेक नेते, आमदार आणि खासदार सेना सोडून शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Dipali Sayyed) या देखील शिंदे गटात (Shinde Group) जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर (Thackeray Group) आणि नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या टीकेला शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उत्तर दिले आहे. दीपाली सय्यद जे काही करत आहेत, ते त्यांच्या करियरसाठी करत आहेत. त्यामुळे पहिला डाव भुताचा म्हणून हे सर्व सोडून द्यायचे, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

गेले अनेक दिवस दीपाली सय्यद (Dipali Sayyed) ठाकरे गटात नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर आता त्यांनीच मी शनिवारी शिंदे गटात जाणार असल्याचे सांगत शिक्कामोर्तब केला आहे. दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट देखील घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना आपण शिंदे गटात जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, रश्मी ठाकरे, सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.

संजय राऊतांना झालेली शिक्षा ही त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणे बंद झाल्याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा मोठ्या महत्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असे सय्यद म्हणाल्या.

दीपाली सय्यद यांना सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माणसे किती चटकन बदलतात, याचे मला हसू येते.
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात माझे भाषण झाल्यावर सय्यद यांनी माझे अभिनंदन केले होते.
मी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारुन चांगले केले, असे देखील सय्यद म्हणाल्या होत्या.
कदाचित गेल्या १५ दिवसांत त्यांची भूमिका बदललेली असू शकते.
करिअरसाठी त्यांना तसे करायला लागले असेल. या त्याच दीपाली सय्यद आहेत,
ज्या आमदार गुवाहाटीला गेल्यावर आगपाखड करत होत्या. शेवटी प्रत्येकाला आपले करिअर करायचे असते.
त्यामुळे त्या त्यांचे करिअर करत आहेत. मला वाटते, मी हा सर्व प्रकार पहिला डाव भुताचा समजून सोडून दिला
पाहिजे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Web Title :-  Sushma Andhare | dipali sayyad to join shinde group uddhav thackeray sushma andhare slams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे गटातील खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना…’

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी