SWaCH – Pune Municipal Corporation (PMC) | कचरा गोळा करणार्‍या ‘स्वच्छ’ संस्थेच्या लढ्याला यश; पुणे महापालिका प्रशासनाची पाच वर्षांच्या कराराला मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SWaCH – Pune Municipal Corporation (PMC) | शहरात घरोघरी जावून कचरा ओला व सुका कचरा गोळा करणार्‍या ‘स्वच्छ सहकारी संस्थे’ सोबत पाच वर्षांचा करार करण्यास अखेर महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. मागील काही वर्षांपासून या संस्थेसोबत दीर्घ कालिन करार करण्यास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्यावतीने टाळाटाळ करण्यात येत होती. दरम्यान, स्वच्छ संस्थेने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी केली होती, तसेच नुकतेच विधी मंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चाही काढला होता. संस्थेच्या या लढ्याला अखेर यश आले आहे. (SWaCH – Pune Municipal Corporation (PMC)

स्वच्छ संस्थेच्यावतीने मागील काही वर्षांपासून घरोघरी जाउन विलगीकरण केलेला कचरा गोळा करण्यात येतो. सुमारे ६० लाख लोकसंख्येच्या शहरात जवळपास ८० टक्के घरांमधून कचरा गोळा करण्यासाठी ४ हजार ३०० कर्मचारी राबतात. यामध्ये प्रामुख्याने कागद काच पत्रा गोळा करणार्‍या गरिब कुटुंबातील महिला व पुरूषांचा समावेश आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी या संस्थेबाबत तक्रारीचा सूर आळवत या कामामध्ये नवीन व्यावसायीक संघटनांना काम देण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे या संस्थेचा पुर्वीचा करार संपल्यानंतर एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येत होती. महापालिकेच्या या भुमिकेविरोधात स्वच्छ संस्थेने सातत्याने काम सुरू ठेवत आंदोलने केली. त्यामुळे नवीन संस्थांची एन्ट्री थांबली होती. (SWaCH – Pune Municipal Corporation (PMC)

स्वच्छ संस्थेने सहा महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन स्वच्छ संस्था व त्यांच्या कामाबद्दल माहिती दिली. त्यावेळी शिंदे यांनी महापालिकेसोबत पाच वर्षांचा करार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. परंतू या आश्‍वासनानुसार कार्यवाही होत नसल्याने स्वच्छ संस्थेने नुकतेच विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे आंदोलन केले. यामुळे सूत्रे हालली आणि महापालिका प्रशासनाने संस्थेसोबत पाच वर्षांचा करार करण्याचा निर्णय घेतला.

आयुक्तांनी मान्यता दिली – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग

स्वच्छ संस्थेसोबत पाच वर्षांचा करार करण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भातील तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासोबतच संस्थेच्या समन्वयकांची संख्या ११० वरून १८४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. महापालिका या समन्वयकांच्या मानधनासाठी पुर्वी वर्षाला पाच कोटी रुपये देत होती. संख्या वाढीनंतर आठ कोटी रुपयांपर्यंत हा खर्च वाढणार आहे. घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी आणखी पाच ते सहा संस्थांचे अर्ज आले आहेत. लवकरच सर्व घरांतून ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जातील, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Stamp Duty-Pune News | मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू; 31 जानेवारीपर्यंत लाभ घेता येणार