महाराष्ट्राची मेडिकल टॉपर बनली साध्वी

मालेगाव : वृत्तसंस्था

राज्यातील एका मेडिकल टॉपरने दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तिच्या या निर्णयाला कुटुंबाने मान्यता देऊन तिचा निर्णय आनंदाने स्विकारला आहे. मालेगाव येथील हिंगाड कुटुंबातील मोठी मुलगी हीना हिंगाड असे या साध्वीचे नाव आहे.  हीना हीने सुरत येथील आचार्य यशोवर्मा सुरीश्वर यांच्याकडे दीक्षा घेतली.

हीना शाळेत नेहमी टॉपर राहिली आहे. तिने एमबीबीएस होण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय पदवीच्या काळात तिने मुंबईसह तीन ठिकाणी मेडिकल प्रॅक्टीस केली. हीना ही अशोक आणि धनवती हिंगाड यांची कन्या आहे. यापुढे ती विशारद माताजी म्हणून ओळखली जाणार आहे. हीनाने चेन्नई, मालेगाव आणि लोणी इथे शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत हिंगाड कुटुंबीयांमधील१४ जणांनी दीक्षा घेतली आहे. हीनाच्या कुटुंबातली दीक्षा घेणारी ती पहिलीच आहे.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79a5faeb-8c16-11e8-9481-e52b7c928516′]

हीनाच्या दीक्षा समारंभास उपस्थित असलेले तिचे मामा नीरज खिचा म्हणाले, ‘तिला दहावीत ९४ टक्के गुण होते. १२ वीत ८६ टक्के गुण होते. लोणीच्या विखे पाटील मेडीकल कॉलेजची ती गोल्ड मेडलिस्ट आहे. इंटर्नशीपनंतर तिने मालेगाव, डहाणू आणि मुंबईत मेडिकल प्रॅक्टिस केली. पण तिने डॉक्टर व्हावं हे तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. ती १७ वर्षांची असल्यापासून तिला अध्यात्माचे वेध लागले होते. तेव्हा तिने ४५ दिवस उत्थान तप केला होता. तिने संघात जाण्याचीही इच्छा व्यक्त केली पण तिला कुटुंबीयांनी थांबवले.’