नाक अन् कपाळ होतंय तेलकट मग करा हे उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  चेहरा व चकचकीत असणे हे हेल्दी त्वचेचे लक्षण आहे. पण, चेहर्‍याची ही चकाचकी त्वचा लवकर काळवंडते. विशेषत: नाक व कपाळ या भागावर त्वचा अधिक चकचकीत दिसते. चेहरा नीट निरखून पहावा. नाकावर आणि कपाळावर त्वचा अधिक तेलकट दिसत असेल तर अशा त्वचेसाठी काही स्किनकेअर टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे.

असा करा चेहरा स्वच्छ

त्वचा ही अशा पद्धतीने तेलकट होत असेल तर चेहर्‍याची स्वच्छता करणे हे महत्वाचे आहे. ज्यावेळी उन्हात जाणं किंवा एसीमध्ये बसणं असे बरेचदा होतं. अशावेळी कपाळ आणि नाकावर तेलकटपणा येतो. चेहरा असा ओला झाल्यानंतर मेकअप जाण्याची शक्यता अधिक असते. अशा त्वचेवरील पोअर्स हे खुले असतात. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तेव्हा चेहरा स्वच्छ करावा.

तेलकट प्रॉडक्ट लावणे टाळा

त्वचा ही केवळ टी झोनमध्ये तेल असल्यामुळे तेलकट होत नाही. अशी त्वचा सर्वसाधारणपणे मिश्र त्वचा मानली जाते. अशा त्वचेने काळजी घेण्यासाठी तेलकट प्रॉडक्टचा वापर टाळावा. त्वचेच्या बेसवर मॉईश्चरायझर, प्राईमर किंवा फाऊंडेशन मुळीच तेलकट लावू नये.

जर तुम्हाला चेहर्‍यावर बेसची शक्यता नसेल तर तुम्ही तो लावण्याची अजिबात घाई करु नये. कारण अधिक मेकअप करणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. चेहर्‍याला गरजे इतकाच मेकअप लावावा. त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसेल. त्यामुळे मेकअप शक्यतो टाळावा.

त्वचा हायड्रेट ठेवावी

त्वचा तेलकट वाटत असली तरी ती हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चांगले फेस मिस्ट त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेवरील असलेला अतिरिक्त तेलकटपणा हा कमी झाला तरी त्वचेला हवे असलेले मॉईश्चर मिळते.

टोनरचा वापर करावा

टोनर हे त्वचेचे पोअर्स बंद करण्यासाठी टोनर हे फार फायद्याचे असते. टोनरचा प्रयोग केला तर त्यामुळे त्वचा चांगली दिसते. तेलकटपणा कमी दिसतो व त्वचा चांगली दिसते. याशिवाय त्वचेवरील पोअर्सचा आकारही कमी होण्यास मदत होते.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)