Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | राज अनाडकतच्या जागी हा अभिनेता साकारणार ‘टप्पू’

पोलीसनामा ऑनलाईन : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हि सोनी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचे अनेक चाहते आहेत. या मालिकेतील एक एक कलाकार आता मालिका सोडून जात आहेत.आणि त्यांच्या जागी नवीन कलाकार घेत आहेत. या नव्याने आलेल्या कलाकारांनाहि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि मालिका पुढे जात राहिली. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनाडक याने शोचा निरोप घेतला. मात्र, आता अभिनेता नितीश भलूनी टप्पूच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मालिकेत टप्पू नावाच्या पात्राला दोन वेळा बदलण्यात आलं. भव्य गांधी हा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारत होता, पण काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली. त्यानंतर राज अनाडकतने टप्पूची भूमिका 5 वर्ष साकारली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. पण काही महिन्यांपूर्वी त्यानेही मालिका सोडली. आणि आता नितीश भलूनी हा टप्पूची भूमिका साकारणार आहे . नीतीश भलूनीने शोमध्ये टप्पूच्या भूमिकेसाठी शूटिंग सुरू केलं असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याआधी नीतीश भलूनीने मेरी डोली मेरे अंगना या टेलिव्हिजन शोमध्ये भूमिका साकारली होती. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

याआधी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमात महत्त्वाची तारक मेहताची भूमिका साकारत असणारे
शैलेश लोढा यांनी एप्रिल 2022 मध्ये हा शो सोडला होता.
करारावरून वाद झाल्याने तसेच त्यांनी दिलेल्या तारखांचा योग्प वापर शोमध्ये झाला नाही अशी त्यांची तक्रार होती.
मात्र त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
त्यांच्या जागी निर्मात्यांनी सचिन श्रॉफची निवड केली.
तसेच तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहता,टप्पूची आई म्हणजेच दयाबेनची
भूमिका साकारणारी दिशा वकानी यांच्यासह अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे.

Web Title :- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | nitish bhulani replaces raj anadkat as tapu in tarak mehta ka ulta chasma