Tamanna Bhatia | तमन्नाच्या चाहत्याने तिच्यासाठी तोडले बॅरिकेट्स; हात घेतला हातात, व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) सध्या चर्चेत आहे. तिचा आगामी अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांच्यासोबतचा ‘जेलर’ हा चित्रपट (JailerMovie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे. चित्रपट आणि त्यातील ‘कालावा’ या गाण्यामुळे (Kaavaalaa Song) तमन्ना लाईमलाईटमध्ये आहे.अनेकदा ती चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येते. दरम्यान ती केरळ (Kerala) मध्ये देखील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.यावेळी तिच्या लूकची तर चर्चा झालीच पण त्याचबरोबर तिच्या चाहत्यांने तिलाभेटण्यसाठी अगदी बॅरिकेट तोडल्याने देखील हा इव्हेंट गाजला. तमन्नाच्या (Tamanna Bhatia) या चाहत्यांने तिला सगळ्या सिक्युरिटी मधून गाठले आणि तिचा हात हातात घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने दाक्षिणात्य व बॉलीवुड (Bollywood News) अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्येआपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. तमन्नाने नुकतीच केरळ मधील इव्हेंटला उपस्थिती लावली. यावेळी तिने हेव्ही डिझायनर साडी व डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. तिने स्टाईल केलेली टेम्पल ज्वेलरी लक्षवेधी ठरत होती. तिने सोबतच लाईट मेकअप केला होता. या इव्हेंटमधून ती बाहेर पडत होती. तिच्या अवतीभोवती अनेक बॉडीगार्ड व सिक्युरिटी गार्ड देखील होते.तरी देखील तिच्या चाहत्याने बॅरीकेट तोडून (Tamanna Fan Moment) तिच्या पर्यंत धाव घेतली. आणि अचानक तिचाहात हातात घेतला. या सर्व घटनेने ती देखील अवाक झाली.

अभिनेत्री तमन्नाच्या या चाहत्याने तिचा असा हात हातात घेतल्याने तिला देखील कळेनासे झाले. लगेच तिच्या बॉडीगार्डने त्याचाहत्याला मागे घेतले व धरुन ठेवले. तो चाहता तमन्नासोबत एकदा भेटण्या साठी विनवणी करु लागला. ही परिस्थिती तमन्नाने सावरली वत्याला सोडा आणि फोटो काढू द्या असे सांगितले. यानंतर चाहत्याने तिलाहॅन्ड शेक केला व सेल्फी देखील काढला. मात्र सोशल मीडियावर सर्वत्र तमन्नाच्या या चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी ती ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) मध्ये झळकली होती. यामध्ये तिने अनेक वर्षे पाळलेली ‘नो किसिंग पॉलिसी’ (No Kissing Policy) देखील तोडली. यामध्ये ती ऑनस्क्रीन रोमांस करताना दिसली. सध्या तिचे अभिनेता विजय वर्मा सोबत अफेअर (Tamanna And VijayVerma Affair) देखील चालू आहे. आता लवकरच ती थलायवा रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) सोबत ‘जेलर’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यामधील ‘कावाला’ हे गाणे सध्या धुमाकूळ घालत आहे. ‘जेलर’ चित्रपट य़ेत्या 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या (JailerRelease Date) भेटीस य़ेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parking Regulations Revamped at Kokane Chowk in Pimple Saudagar to Enhance Traffic Flow