‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्रीचे BOLD फोटो ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा हीचे इंटनेरनेट सेन्शेशन अभिनेत्रींच्या यादीमध्ये नाव गणले जाते. नेहा सोशलवर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती बिनधास्त आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो चाहते लाइक देखील करत असतात. अभिनेत्री नेहा सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ती आपले व्हेकेशनचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.

नेहा शर्माचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो. त्यामुळे ऑन एंड ऑफस्क्रिन लूकमधील नेहाच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. नेहाने २००७ मध्ये ‘साली’ तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती.

नेहा आता अजय देवगणचा ‘तानाजीः ग अनसंग वॉरियर’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. नेहाच्या करिअरमधील सगळ्यात मोठा हा चित्रपट आहे. या चित्रपटात नेहा देवीच्या भूमिकेत दिसणार आहे.

नेहाने आत्तापर्यंत ‘तुम बिन २’, ‘क्या सुपर कुल है हम’ , ‘यंगिस्तान’ , ‘यमला पगला दिवाना’ चित्रपटात काम केले आहे. एफएचएम या मॅगेझिनने नेहाला जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीत सातवे स्थान दिले आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच पसरत असते.

https://www.instagram.com/p/B3tEQw2AT9w/

Visit : Policenama.com