Tata Group-TCS Fined | टाटा ग्रुपच्या कंपनीला 1600 कोटी रुपयांचा दंड, गंभीर आरोपावर कोर्टाचा मोठा निर्णय, आव्हान देणार TCS

नवी दिल्ली : Tata Group-TCS Fined | टाटा ग्रुप आणि देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीएसीएस) ला १९४.२ मिलियन डॉलर म्हणजे १,६२२ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने टीसीएसवर हा मोठा दंड लावला आहे. कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.(Tata Group-TCS Fined)

कंपनीने सांगितले की, नॉदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ टेक्सासच्या युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टाने हा दंड ठोठावला आहे. मात्र, टीसीएसने म्हटले की, त्यांच्याकडे अमेरिकन कोर्टाच्या या निर्णयाविरूद्ध भक्कम आधार आहे, यासाठी ते या निर्णयाविरोधात अपील करण्याचा विचार करत आहेत. कंपनीने अपेक्षा व्यक्त केली की, रिव्ह्यू पीटिशननंतर निर्णय त्यांच्या बाजूने लागेल.

टीसीएसला का ठोठवला दंड
कोर्टाने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसवर १६०० कोटी रुपयांचा दंड ट्रेड सीक्रेटचा दुरुपयोग केल्याबाबत लावला आहे. हे प्रकरण कम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशन (सीएससी) संबधी आहे, ज्याचे डीएक्ससी टेक्नोलॉजीमध्ये मर्जर झाले आहे. सीएससीने टीसीएसविरूद्ध ट्रेड सीक्रेटच्या दुरुपयोगाचा आरोप केला होता.

टीसीएसला ठोठवलेल्या या दंडात कॅम्पनसेटरी डॅमेजचे ५६.१५ मिलियन डॉलर, ११.२३ मिलियन डॉलर एक्झेम्पलरी डॅमेज आणि २५.७७ मिलियन डॉलरच्या प्रीजजमेंट इंटरेस्टचा समावेश आहे.

मात्र, टीसीएसचे म्हणणे आहे की, अमेरिकन कोर्टाच्या या निर्णयाने त्यांच्या आर्थिक स्थितीवर कोणताही फरक पडणार नाही. बाजार भांडवलाच्या दृष्टीने टीसीएस, भारताची दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mutual Funds | 15x15x15 इन्व्हेस्टचा हा नियम तुम्हाला बनवू शकतो करोडपती, जाणून घ्या काय आहे तो?

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करुन दहशत माजवणाऱ्या भाईच्या आवळल्या मुसक्या