अल्पायुषी सर रतन टाटा अवघ्या TATA समूहाला ‘समाजकार्य’ आणि ‘दानशूरपणा’चा वसा लावून गेले

पोलिसनामा ऑनलाईन – टाटा समुहाला उभे करण्यात जी चार व्यक्तीमत्वे आहेत, त्यापैकीच सर रतन टाटा हे एक आहेत. जमशेदजी टाटा, दोराबजी टाटा आणि रतनजी दादाभाई टाटा असे अन्य तीन व्यक्तीमत्व आहेत. सर रतन टाटा हे रतनजी या नावाने लोकप्रिय होते. त्यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. अशा या समाजसेवेचे व्रत अंगी असलेल्या सर रतन टाटा यांना अल्पायुष्यच लाभले, मात्र त्यांनी तेवढ्या आयुष्यातही एवढी मोठी कामे केली आणि टाटा समुहासाठी मोठी संपत्ती सोडून गेले.

२० जानेवारी १८७१मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना मुलबाळ नव्हते. रतनजी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नवजबाई यांनी त्यांच्याच नात्यातातील एका अनाथ मुलाला म्हणजेच नवल यांना दत्तक घेतले. आताचे रतन टाटा याच नवल यांचे मुलगे आहेत.
सर रतनजी यांनी सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. मोठे भाऊ दोराबजी टाटा यांच्यापेक्षा ते १२ वर्षांनी छोटे होते. त्यांनी टाटा अँड सन्सला १८९६ मध्ये जॉईन केले. १९०४ मध्ये वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी फ्रान्सची कंपनी युनियन फायर इन्शुरन्सकंपनीचे काम पाहण्यास सुरुवात केली. या कंपनीला टाटा अँड सन्सने भागीदारीत आणले होते.

१९१२ मध्ये साचीमध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी त्यानंतर १९१५ मध्ये मुंबईजवळ मोठा जलविद्युत प्रकल्प सुरु केला. त्यांनी समाजकार्य करण्यासाठी टाटा ट्रस्ट फंडची स्थापना केली. जो आज टाटा ट्रस्टचा दुसरा सर्वात मोठा फंड आहे.

समाजकार्य आणि दानशूरपणा अन सर ही उपाधी
आफ्रिकेमध्ये वर्णवादाविरोधात जेव्हा महात्मा गांधींनी आंदोलन केले तेव्हा त्या आंदोलनाला टाटा यांनी १.२५ लाख रुपयांची मदत केली होती. ते स्वातंत्र सैनिक व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे मित्र होते. त्यांनी गोखले यांच्या कामांसाठीदेखील दहा वर्षे प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली होती.लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी ४०० पाऊंडची मदत देत होते. या चेअरला आता ‘सर रतन टाटा फाउंडेशन’ चे नाव देण्यात आले आहे.

१९१३ ते १९१७ मध्ये पाटलिपुत्र (पटना)मध्ये पहिली पुरातत्व खोदकाम होणार होते. यासाठी त्यांनी पैशांची मदत केली. या खोदकामात सम्राट १०० स्तंभांचा मौर्यकालीन दरबार सापडला होता. १९०५ मध्ये त्यांच्याच मदतीने म्हैसूरमध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंटिफिक अँड मेडिकल रिसर्चची स्थापना करण्यात आली.

बॉम्बे नगर निगमद्वारे सुरु केलेल्या किंग जॉर्ज पंचम अँटी ट्यूबरक्युलॉसिस लीगसाठी दहावर्षांपर्यंत १० हजार रुपये दान केले.त्यांची समाजसेवा पाहून ब्रिटीश सरकारने त्यांना १९१६ मध्ये नाइटहुड म्हणजेच सर ही उपाधी दिली.

समाजकार्य आणि दानशूरपणाचा वसा शिकविणाऱे थोर रतनजी हे अल्पायुषी ठरले. ५ सप्टेंबर १९१८ मध्ये त्यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची बहुतांश संपत्ती समाजोपयोगी कामासाठी दान देण्यात आली. यानंतर 1१९१९ मध्ये ८० लाख रुपयांचा फंड देऊन सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना करण्यात आली.