Tata Motors | आकर्षक व्याजदरासह सर्व कारवर मिळणार 90 % फायनान्स, Tata Motors ने सुरू केली स्कीम

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Tata Motors | आकर्षक व्याजदरासह कारव 90 टक्के फायनान्सची स्कीम (90 percent finance scheme) टाटा मोटर्स (Tata Motors) ने सुरू केली आहे. टाटा मोटर्सने प्रवाशी वाहनांसाठी आपल्या ‘न्यू फॉर एव्हर’ रेंज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) सोबत एक भागीदारी (partnership) केली आहे.

या भागीदारीनुसार टाटा मोटर्स आणि बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी ‘महा सुपर कार लोन स्कीम’ उपलब्ध करणार आहे.
ज्यामध्ये ग्राहकांना 7.15% (minimum primary interest rate of 7.15%) सारख्या किमान प्राथमिक व्याजदरावर आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटसह कर्ज देईल.

ADV

ज्यासोबत ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सात वर्षाच्या कर्जाच्या पीरियडवर किमान 1517 रुपयांचा ईएमआय सादर केला आहे.
या योजनेत पगारदार कर्मचारी, स्वयंरोजगार, व्यावसायिक आणि शेतकर्‍यांसाठी वाहनाच्या एकुन किंमतीवर (ऑन-रोड प्रायसिंग) कमाल 90% फायनान्स सादर केले आहे.

मात्र, कॉर्पोरेट ग्राहकांनी कार फायनान्स केल्यास वाहनाच्या किंमतीच्या कमाल 80% फायनान्स होईल.
टाटा मोटर्स आणि बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे सुरू करण्यात आलेली ही स्कीम ग्राहकांसाठी मान्सून धमाका ऑफरच्या अंतर्गत 30 सप्टेंबर 2021 लागू राहील.
यामध्ये प्रोसेसिंग शुल्काशिवाय लोन मिळवण्याचा पर्याय आहे.

या फायनान्स स्कीममध्ये ग्राहक कोणतेही अगाऊ पेमेंट न करता आणि ताबडतोब मंजूरी होणार्‍या कर्जाचा फायदा घेऊ शकतात.
या स्कीममध्ये कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंटवाले ग्राहक आणि हौसिंग लोकन घेणार्‍या ग्राहकांसाठी लोनमध्ये 0.25 टक्के सूट दिली जात आहे.

 

Web Title : tata motors and bank of maharashtra launch new scheme customers get 90 percent finance on all cars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | गुन्हे शाखेकडून परराज्यातील तीन नागरिकांना अटक, 3 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Former Minister Sanjay Rathod | ‘त्या’ महिलेच्या आरोपांबाबत पोलीस नोंदवणार आता माजी वनमंत्री संजय राठोड यांचा जबाब

Neeraj Chopra | मायदेशी परतताच गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल