TATA ग्रुप देणार चीनला झटका ! आता भारतातच बनणार मोबाइलचे सर्व पार्ट्स, 1.5 अरब डॉलरच्या प्रोजेक्टने होणार ‘कायापालट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा ग्रुपची कंपनी टाटा सन्स आपल्या विस्तार योजनेंतर्गत प्रत्येक सेक्टरमध्ये आपला उद्योग वाढवत आहे. अगोदर सुपर अ‍ॅपद्वारे ऑनलाइन ग्रोसरी उद्योगात उतरण्याची योजना आणि आता मोबाइल पार्ट्स बनवण्यासाठीसुद्धा टाटांनी कंबर कसली आहे. कंपनी तामिळनाडुमध्ये यासाठी नवीन प्लँट उभारत आहे.

आत्मनिर्भर अभियानाला प्रोत्साहन
मोदी सरकारने आत्ममिर्भर योजनेंतर्गत मोबाइल हँडसेट उत्पादकांना भारतात उत्पादन करण्यासाठी पीएलआयची घोषणा केली आहे. ज्यानंतर कंपन्यांनी भारतात उत्पादन करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, आतापर्यंत मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी कुणीही पुढे आले नव्हते. अजूनही मोबाइलचे पार्ट्स बाहेरून येत आहेत. टाटांच्या या योजनेनंतर भारतात हा उद्योग वाढेलच शिवाय चीनलासुद्धा मोठा झटका बसणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात चीनकडूनच मोबाइलचे पार्ट्स भारतात येतात.

1.5 अरब डॉलरचा असेल प्रोजेक्ट
टाटा सन्सचा हा प्रोजेक्ट सुमारे 1.5 अरब डॉलरचा असू शकतो. एका रिपोर्टनुसार, कंपनी या प्रोजेक्टसाठी 1.5 अरब डॉलर कर्जाच्या तयारीत आहे. यापैकी 75 कोटी ते एक अरब डॉलरची रक्कम एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोईंगद्वारे जमवली जाईल. नवा प्लँट आणि कंपनीसाठी सीईओचासुद्धा शोध सुरू आहे.

एव्हिएशनमध्येसुद्धा विस्तार
एअर आशिया भारतात टाटा सन्ससोबत आपला उद्योग चालवते. यामध्ये टाटा सन्सची भागीदारी 51 टक्के आहे, तर एअर आशियाकडे 49 टक्केची भागीदारी आहे. कंपनीने मागील महिन्यातच जपानमध्येसुद्धा आपला उद्योग बंद केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा सन्स एअर आशियामधील इतर भागीदारीसुद्धा खरेदी करण्याबाबत बोलत आहे. टाटा सन्स एअर आशियामध्ये 100 टक्केची भागीदारी खरेदी करू शकते. यानंतर एअर आशियावर टाटा सन्सचा पूर्ण हक्क होऊ शकतो.