Coronavirus Vaccination : ‘या’ 7 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लस; कुटुंबातील सदस्यांचाही होणार समावेश

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावरील लस दिली जात आहे. त्यानुसार, देशभरात लसीकरणाचा हा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. ही लस घेण्यासाठी प्री-रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ही लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे सांगण्यात येत आहे.

आता अशा काही कंपन्या आहेत त्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसींचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इंफोसिस (Infosys) आणि सॉफ्टवेअर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर (Accenture), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (TCS), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि आरपीजी ग्रुप्स (RPG Groups) चा समावेश आहे. या सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनावरील लशींचा खर्च स्वत: उचलणार आहेत. याशिवाय इंडियन बँक्स एसोसिएशनने (Indian Banks Association) सर्व सदस्य बँकांची अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. ज्यामध्ये बँकांपासून एम्प्लॉईजच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचा विचार करत आहे. याशिवाय आणखी काही कंपन्याही हा लसीकरणाचा खर्च उचलणार आहे.

कंपन्या म्हणतात…

इंफोसिस आणि एक्सेंचर कंपनीने याबाबत सांगितले, की भारतातील कर्मचाऱ्यांसाठी कोरोनावरील लशीचा पूर्ण खर्च उचलणार आहे. इंफोसिसचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर प्रवीण राव यांनी म्हटले, की इंफोसिस त्यांच्या कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना कोरोनावरील लस घेण्यासाठी हेल्थकेअर प्रोव्हायडर्ससह पार्टनरशिप करण्याच्या तयारीत आहे. तसेच एक्सेंचरनेही सांगितले, की ते कर्मचारी आणि त्यांच्यावर आधारित असलेल्या सदस्यांचाही कोरोनावरील लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.