Jio चा भन्नाट प्रीपेड प्लॅन ! 600 रूपयांपेक्षा कमी किंमतीत 84 दिवसांपर्यंत दररोज मिळेल 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   टेक डेक्स। Reliance Jio ही भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक आहे. JIO जवळ सध्या वेगवेगळी वैधता आणि किंमती असणारे रिचार्ज आहेत, ज्यामध्ये हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि ओटीटी अँप ची सबस्क्रिप्शन दिली जात आहे. येथे आम्ही तुम्हाला जिओ बेस्ट सेलिंग प्रीपेड प्लानबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला रोज २ GB डेटा आणि यासोबत अनेक फायदे दिले जात आहेत. चला जाणून घेऊया जिओच्या या प्रीपेड प्लान बद्दल…

JIO चा 599 रुपयांचा प्लान

Reliance Jio ने या प्रीपेड प्लानला खास एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ला टक्कर देण्यासाठी बनवले आहे. हा रिचार्ज प्लान 84 दिवसांच्या मुदतीसह येत आहे. या प्रीपेड योजनेत ग्राहकांना 2GB डेटा आणि 100SMS मिळतील. तसेच, वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यास सक्षम असतील. या व्यतिरिक्त या योजनेसह ग्राहकांना JIO क्लाऊड, जिओ टीव्ही आणि जिओ न्यूज यासारख्या प्रीमियम अँप्सची फ्री सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे.

JIO आणि ITEL लॉंच करू शकतात स्वस्त मोबाईल

आम्ही तुम्हाला सांगतो की जिओने अलीकडेच ITEL बरोबर भागीदारी केली आहे. आता बातमी अशी आहे की या दोन्ही कंपन्या एकत्र भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोन आणू शकतात. या लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हे आगामी डिव्हाइस त्या ग्राहकांसाठी सादर केले जाईल, ज्यांना या फीचर वरून स्मार्टफोनमध्ये स्थानांतरित व्हायचे आहे. या डिव्हाइसची किंमत ७,००० रुपयांच्या खाली ठेवली जाऊ शकते. तथापि, अहवालात या डिव्हाइसच्या स्पेशलायजेशची माहिती मिळाली नाही.

JIO ला बसला फटका

भारत सरकारने काही दिवसांपूर्वी 5G नेटवर्कला घेऊन मोठे विधान केले होते. सरकारच्या म्हणण्यानुसार, यंदा 5G नेटवर्क देशात रिलीज केले जाणार नाही. पुढील वर्षी हे नेटवर्क आणले जाऊ शकते. संसदीय समितीच्या अहवालानुसार, पुढील ६ महिन्यानंतर आणखी एक स्पेक्ट्रमी लिलाव होणार आहे. त्यानंतरच पुढच्या वर्षांपर्यंत 5G भारतात दाखल केले जाईल.

Reliance चे CIO मुकेश अंबानी यांच्या योजनेला सरकारच्या घोषणेमुळे फटका बसला. मुकेश अंबानी म्हणाले की JIO वर्ष 2021च्या दुसऱ्या उत्तरार्धात भारतात 5G सेवा सुरु करेल. या 5G सर्व्हिसमध्ये JIO आघाडीवर असेल.