दीड हजाराची लाच घेताना तांत्रीक सहाय्यक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – रेशीम उद्योजकाकडून कामगारांचे पगार काढण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना तांत्रीक सहायय्कला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई आज (गुरुवार) इंदापूर येथील संविधान चौकात केली.
ब्रम्हदेव संदिपान शिंगाडे (वय-३० रा. अंबिका नगर, टेंभुर्णी नाका, इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या तांत्रीक सहायकचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय उद्योजकाने तक्रार केली होती.
तक्रारदार यांचा रेशीम उद्योग आहे. उद्योगाकरीता त्यांनी मनरेगा मधुन अनुदान घतले आहे. त्यांच्याकडे एकूण दहा कामगार काम करत असून त्यांचा पगार तहसिलदार कार्यालयातून काढला जातो. तक्रारदार यांनी कामागारांचे पगाराचे मस्टर तांत्रीक सहाय्यक शिंगाडे यांच्याकडे सादर केले . त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे पगार खात्यावर जमा होतात.
कामगारांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शिंगाडे याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार अॅन्टी करप्शन पथकाकडे केली. पथकाना तक्रारीची पडताळणी करुन संविधान चौकात सापळा रचला. आरोपी शिंगाडे याला तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेतालना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.

जाहिरात