Tejaswi Abhishek Ghosalkar | ”अभिषेक घोसाळकर खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या”, पत्नीची मागणी, तर फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडील म्हणाले…

मुंबई : Tejaswi Abhishek Ghosalkar | शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारीला फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडून हत्या झाली होती. यावेळी हत्या करणारा मॉरीस नरोना याने स्वत:वर देखील गोळ्या झाडून घेतल्याने त्याचाही कथित मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज अभिषेक यांचे वडिल विनोद घोसाळकर आणि पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.

या पत्रकार परिषदेला विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांचे वकील उपस्थित होते.

यावेळी मृत अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, माझ्या पतीच्या हत्याप्रकरणात योग्यप्रकारे तपास होत नाही. नगरसेवकांवर दबाव टाकला जात आहे. छोट्या-छोट्या गोष्टीवरुण पोलीस गुन्हे दाखल करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत आहेत.

तसेच तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, अभिषेक यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोनाने त्यादिवशी मलाही कार्यक्रमाला बोलावले होते. पण उशिर झाल्याने अभिषेक यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवले. अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारीख यांचा वावर याबाबत आयुक्तांना तपास करण्यासाठी सांगितले होते. ५ मार्च रोजी न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले ते महत्त्वाचे आहे. मॉरिस आणि मिश्राने सोबत बुलेट खरेदी केल्या. ती गन त्याची होती. मोरीसला त्याचा अ‍ॅक्सिस होता. आम्ही जमा केलेल्या गोष्टी आणि इतर पुरावे पोलिसांकडे दिले आहेत आणि तपासाची मागणी केली होती.

तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, सीसीटीव्ही फुटेज दिले होते, यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केलेली होती. अभिषेक आणि मॉरिस यांच्यात असणारे वाद मिश्राला माहिती होते. पतीच्या हत्येमुळे माझ्या दोन मुलांचे भविष्य, माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. हायकोर्टाला एवढीच विनंती की त्यांनी लवकर निकाल लावावा.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर दु:ख व्यक्त करताना विनोद घोसाळकर म्हणाले, अभिषेकच्या
हत्येनंतर गृहमंत्र्यांनी केलेले वक्तव्य वाईट होते. गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का?
असे ते विरोधीपक्षांना म्हणाले. मंत्री उदय सामंत म्हणाले हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले दोघांमध्ये गोळीबार झाला, त्याला पोलीस काय करणार? मी या तीनही लोकांसोबत काम केले
आहे. माझ्या परिवाराला ते ओळखतात. तरीही त्यांनी असे बेजबाबदार वक्तव्य केले. यामुळे जास्त दु:ख झाले.

विनोद घोसाळकर पुढे म्हणाले, आम्ही जे फुटेज पोलिसांना दिले आहे त्यात अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि आणखी
एक अज्ञात व्यक्ती वावरताना दिसत आहे. हे फुटेज आम्ही जमवलेल आहे, पोलिसांनी नाही. गृहमंत्री सभागृहात म्हणाले
की गोळीबार झाला तेव्हा तिथे तिसरा व्यक्ती नव्हता. आम्ही तीन पत्र पोलीसांना दिली आहेत की तिसरा व्यक्ती कोणी होता का? याचा तपास करावा.

घोसाळकर म्हणाले, तपास अधिकारी डीसीपी आणि सीनियर पीआय यांना मी आमच्याकडील फुटेज दाखवले.
त्यांच्याकडे ते नव्हते. दोघेही एकत्र कसे गोळ्या खरेदी करायला जातात? कलम १२० बी हे कट रचण्याचे कलम अद्याप
लावले नाही. ४० दिवस झाले, पण अद्याप तपास योग्य दिशेने सुरु नाही.

घोसाळकर पुढे म्हणाले, पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आम्ही हायकोर्टात रिट पिटीशन करणार आहोत.
तपास यंत्रणा बदलून द्या, अशी मागणी करणार आहोत. मॉरिसला मिश्राने गन दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
एकत्र जाऊन गोळ्या खरेदी केल्या असेही म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना आवाहन करताना घोसाळकर म्हणाले, तपास नीट होत नाही. मुख्यमंत्र्यांना मुल जाण्याचे दु:ख काय असते
हे माहिती आहे. अभिषेक माझा मुलगा होता त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Marged Villages In PMC | महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांना अखेर यूडीसीपीआर नियमावली लागू ! समाविष्ट गावातील रखडलेल्या हजारों बांधकांना होणार फायदा; उद्योजक राहुल तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

Sushilkumar Shinde On PM Narendra Modi | सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर टीका; पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय शिरलं माहिती नाही…