Sushilkumar Shinde On PM Narendra Modi | सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर टीका; पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय शिरलं माहिती नाही…

सोलापूर : Sushilkumar Shinde On PM Narendra Modi | मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री होते, तोपर्यंत बरे होते. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय शिरलं माहिती नाही, अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निरंजन टकले उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, खोटे बोलणारा आणि फसवणारा पंतप्रधान भारतीय जनतेने दहा वर्षे स्वीकारला. मागील दहा वर्षांत भाजपने जनतेला फक्त भुलभुलैया केले आहे. सोलापूरला डाळिंब संशोधन केंद्र, वेगळे विद्यापीठ, एनटीपीसी, सोलापूर – पुणे – हैद्राबाद महामार्ग कोणी आणला? हे सर्व आम्ही आणले आणि भाजपवाल्यांनी उद्घाटन केले. मोदींची कसली गॅरंटी, माहिती नाही. हा देश गांधी-नेहरूंचा आहे.(Sushilkumar Shinde On PM Narendra Modi)

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सोलापूर शहर हे स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे शहर आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून दिले तर सोलापूरचा डंका दिल्लीत वाजेल. येणाऱ्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना निवडून द्या.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपने प्रणिती शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र त्या काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Maharashtra Mahayuti Govt | राज्य विकासात मागे आणि गुन्हेगारीत पुढे, रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका

Pune Khadki Crime | अनैतिक संबंधातुन खडकी परिसरात तरुणाचा खून, आरोपीला 24 तासात अटक

Pradeep Sharma | लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा

Pimpri Dighi Crime | पिंपरी : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Kothrud Crime | ज्यूस विक्रेत्याला मारहाण, एकाला अटक, कोथरुड परिसरातील घटना