Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुनियादारी चित्रपटाबद्दल केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

पोलीसनामा ऑनलाइन : Tejaswini Pandit | मराठी चित्रपटसृष्टीत ‘दुनियादारी’ या चित्रपटाने सर्वच विक्रम मोडले होते. आजही दुनियादारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आहे. ‘एक वेगळी दुनिया एक वेगळीच दुनियादारी’ असे म्हणत दुनियादारीने प्रेक्षकांना आपलेसे केले होते. या चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. आता याच चित्रपटाबद्दल अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मोठा खुलासा केला आहे. (Tejaswini Pandit)

अभिनयाच्या जोरावर नाव मिळवलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केली आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेब सिरीजमुळे सध्या तेजस्विनी चर्चेत आहे. तेजस्विनीने दिलेल्या एका मुलाखतीत तिने दुनियादारी या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटाबाबत बोलताना तेजस्विनी म्हणाली की, “दुनियादारी या चित्रपटातील शिरीनचा रोल मला ऑफर करण्यात आला होता. (Tejaswini Pandit)

16 तारखेला माझे लग्न होते आणि 20 तारखेला या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती.
त्यासाठी मला संजय दादांनी हातावर मेहंदी काढण्यास नकार दिला.
त्यामुळे मी स्वतःच्या लग्नात हातावर मेहंदी देखील काढली नव्हती.
मात्र बाबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये दुनियादारीची बातमी वाचली त्यात कुठेही माझे नाव नव्हते.
मग मी अनेकांना फोन केले मात्र मला नीट असे उत्तर मिळालेच नाही आणि या चित्रपटात मला का नाकारले
याचे उत्तर आजही मला मिळालेले नाही “. तेजस्विनीच्या या बोलण्याने सगळेच बुचकळ्यात पडले आहेत.
दुनियादारी या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर,
उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते.

Web Title :- Tejaswini Pandit | actress tejaswini pandit big statement talk about i was offered the sai tamhankar role in duniyadari movie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अपघात झाल्याचे सांगून लुटणारी टोळी दत्तवाडी पोलिसांकडून गजाआड, 4 गुन्हे उघडकीस

Rakhi Sawant | राखी सावंतच्या ‘या’ कृत्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? बिग बॉस ने दिली ‘ही’ शिक्षा