काय सांगता ! होय, भारतात ‘कोरोना’ व्हायरसच्या दहशतीनं चक्क मंदिराला लावलं कुलूप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची दहशत आता उत्तर प्रदेशात पसरत आहे. यामुळे लोक सजग झाले आहेत. यामुळे बौद्ध तीर्थ श्रावस्तीच्या डेन महामंग्कोल मंदिराला कुलूप लावण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने मुख्य द्वारावर नोटीस बोर्ड लावला आहे आणि गेटवर कुलूप लावून देशी परदेशी पर्यटकांना प्रवेश निषिध केला आहे. नोटीस बोर्डवर लिहिले आहे की कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला पाहून अनिश्चित काळासाठी मंदिर बंद करण्यात आले आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर मंदिर सुरु करण्यात येईल.

उपजिल्हाधिकारी राजेश मिश्र यांनी सांगितले की श्रावस्ती बौद्ध स्थळ आहे. येथे परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु सध्या जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु लोक सजग झाले आहेत. जागरुकतेच्या कारणाने हे बंद करण्यात आले आहे. काही वेळानंतर हे मंदिर सर्वांसाठी उघडण्यात येईल.

येथील एका स्थानिक नागरिकाने सांगितले की जर वर्षी चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, कोरिया, म्यानमार सह अनेक देशातील जवळपास 2 लाखापेक्षा अधिक बौद्ध भिक्षु येथे येतात. हिवाळ्यात या मंदिरात अनेक ध्यान सत्र चालवले जातात.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी बाहेरुन आपल्या व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे. मंदिर आणि हॉटेलमध्ये सतर्कता बाळगली जात आहे. आणि लोकांना मास्क लावण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.