Jammu : कुलगाम येथे सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला, 4 जवान जखमी

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी आज (बुधवार) सकाळी हल्ला केला. दहशतवाद्यांनी दक्षिणेकडील कुलगाम जिल्ह्यातील शमशीपोरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

या हल्ल्यात लष्कराचे चार जवान जखमी झाले आहे. जखमी जवानांना प्राथमिक उपचारानंतर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने हल्ल्याची पुष्टी केली आहे.

हल्ल्यानंतर सैन्याने परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे गेल्या महिन्यात सौरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. जखमींवर एसकेआयएमएस रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.