बाॅक्स ऑफीसवर ठाकरे vs मणिकर्णिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शुक्रवारी ठाकरे आणि मणिकर्णिका हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही सिनेमांना खास महत्त्व आहे. कारण दोन्ही चित्रपट हे थोर व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित आहेत. ठाकरे हा सिनेमा बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर तर मणिकर्णिका हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर आहे. एका दिवसात या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या दोन्ही सिनेमांच्या एका दिवसाच्या कमाईचा विचार केला असता मणिकर्णिका या सिनेमाने ठाकरे सिनेमावर मात केली आहे असे दिसून येते.
दिवंगत शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर असलेल्या बहुचर्चित सिनेमाने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे कंगनाच्या मणिकर्णिकाने मात्र 8 कोटी 75 लाखांचा गल्ला जमवला आहे. एकूणच ठाकरे सिनेमाच्या तुलनेत मणिकर्णिका या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.  चित्रपट व्यापार विश्लेषकर तरण आदर्श यांनी ट्विटर च्या माध्यमातून याबाबद माहिती दिली आहे.
मणिकर्णिका हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमधून प्रदर्शित करण्यात आला असून ठाकरे हा सिनेमा हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी याने बाळासाहेबांची भूमिका साकारली तर अमृता राव हिने मीनाताई ठाकरेंची भूमिका स्वीकारली आहे.
मणिकर्णिका हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ठाकरे हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ठाकरे या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तीरेखा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. तर अमृता रावने मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे.