थायलंडच्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याच्या पदार्थांमध्ये टाकली जातात गांजाची पाने, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : थायलंडच्या (thailand) एका रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला गांजा आणि भांगच्या पानांपासून तयार केलेली डिश सुद्धा खायला मिळू शकते. होय, एका हॉस्पीटलमध्ये सुरू असलेल्या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये अशा अनेक डिश आहेत. ‘गिग्लिंग ब्रेड‘ आणि ‘जॉयफुली डान्सिंग सलाड‘ अशाच डिश आहेत. रेस्टॉरंटला असे वाटते की, त्यांची भांग आणि गांजाच्या पानांद्वारे बनवलेली डिश परदेशी पर्यटकांना आकर्षित करू शकते. भांगची पाने वापरणे थायलंडमध्ये (thailand) अलिकडच्या काळातच कायदेशीर केले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, थायलंडमध्ये कॅनबिस लीव्हज (भांगची पाने) ला अंमली पदार्थांच्या यादीतून हटवले गेल्यानंतर आणि राज्य-अधिकृत फार्मला भांगची शेती करण्याची परवानगी मिळाल्यानंतर, प्राची बुरी प्रांताच्या एका हॉस्पीटलमधील एका रेस्टॉरंटने या महिन्यापासून वेगळ्या प्रकारचे हॅप्पी मील वाढण्यास सुरूवात केली आहे.

हॉस्पीटलचे प्रोजेक्ट लीडर पकाक्रोंग क्वानकाओ यांनी रॉयटर्सला सांगितले की, भांगची पाने, जेव्हा थोड्या प्रमाणात जरी जेवणात टाकली जातात, तेव्हा ती रूग्णाला आजारातून वेगाने बरे होण्यासाठी मदत करतात. भांगची पाने भूखेत सुधारणा करतात आणि लोकांना चांगली झोप देऊ शकतात, आणि त्यांचा मूडसुद्धा चांगला होऊ शकतो.

हॉस्पीटलला गांजा (मारिहुआना) आणि त्याच्या वेदना आणि थकवा दूर करण्याच्या क्षमतेवर स्टडी करण्यासाठी थायलंडमध्ये एक पॉयनियर म्हणून ओळखले जाते. थायंलंड 2017 मध्ये वैद्यकीय उपचारासाठी भांग वैध ठरवणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश बनला होता आणि तेव्हापासून तिथे अनेक मेडिकल मारिहुआना क्लिनिक उघडे गेले आहेत.

या रेस्टॉरंटमध्ये हॅप्पी पोर्क सूप, डीप फ्राइड ब्रेड ज्यामध्ये गांजाची पाने आणि पोर्कसुद्धा असते, पोर्क आणि कापलेल्या भाज्यांसह क्रिस्पी गांजाची पानांनी डिश वाढली जाते. रेस्टॉरंटमध्ये डिनर करत असलेल्या केटिसरीन बून्सिरी यांनी म्हटले, मी कॅनबिस (भांग) अगोदर कधी घेतली नाही, हे अजब वाटते, परंतु हे स्वादिष्ट आहे.

या रेस्टॉरंटमध्ये जेवणार्‍या नट्टनन नारानन यांनी म्हटले, भांगच्या पानांची चव नेहमीच्या भाज्यांसारखीच होती, परंतु याचे आफ्टर-इफेक्ट खुप वेगळे होते. त्यांनी पुढे म्हटले, याच्यामुळे माझा गळा सुखला आणि मला मिठाई खाण्याची प्रचंड इच्छा झाली.

थाई उप शिक्षणमंत्री कानोकवन विलवन यांनी म्हटले की, पुढील पाऊल आंतरराष्ट्रीय ऑडियन्सपर्यंत प्रसिद्ध थाई पदार्थ सादर करणे होते. कानोकवन यांनी म्हटले, आम्ही अगोदरपासूनच फेमस थाई पदार्थांमध्ये जास्त भांग टाकण्याची योजना आखत होतो, जसे की, हिरवे करी सूप, जेणेकरून या डिशेसची पॉप्युलॅरिटी खुप मोठ्या प्रमाणात वाढवता येईल.