चिपी विमानतळावर पहिलं विमान लँड 

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन 

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर आज  पहिले विमान गणपती बाप्पांना घेऊन उतरले. यावेळी सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सिंधुदुर्गवासियांच्या हक्काच्या विमानतळाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
[amazon_link asins=’B00UFF4CUY,B01CJUPOQS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81cff40d-b678-11e8-b9d4-f19913fcbf9d’]

चेन्नई वरुन उड्डाण केलेलं विमान आज  बारा वाजता  सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर दाखल झाले . यावेळी विमान उतरण्याचा क्षण कैद करण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती.

जिल्ह्याचे पालक मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येनं विमानतळावर ही हवाई चाचणी पाहण्यासाठी उपस्थित होते .  विमानातून आलेल्या  गणपतीच्या मूर्तीची विमानतळावरच वाजत गाजत स्थापना केली जाणार आहे. चिपी विमानतळावर दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जाहिरात.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.