पान शॉप चालकाला ७० हजाराचा चुना

बीड : पोलीसनामा ऑनलाईन
पान शॉप चालकाने बँकेतून काढलेली रक्कम पानटपरीत ठेवली असता त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना तालुक्यातील ईट येथील पानटपरीवर घडली आहे. पान शॉप चालकाने ७० हजार रुपये चोरट्यांनी पळवले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.

परमेवर हरीभऊ चव्हाण (वय २६) यांची गावालतच्या फाट्यावर पानटपरी आहे. गुरूवारी संध्याकाळी ८ वाजता त्यांनी टपरी बंद केली होती. मात्र, बँकेतून काढलेली रक्कम त्यांनी टपरीतच ठेवली. याचाच फायदा घेत गुरूवारी रात्री त्यांच्या शॉपमध्ये डल्ला मारीत अज्ञात चोरट्यांनी रक्कम लंपास केली आहे. शुक्रवारी ही बाब निदर्शनास येताच परमेश्वर यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे हे घटनेचा अधिक तपास करीत आहेत.