फोन नव्हते तेच बरे होते : सचिन तेंडुलकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

सध्या आजूबाजूला पाहिले की हळूहळू कम्युनिकेशन चेंज झाले असून समोरचा काहीतरी बोलतोय आणि तुम्ही फोनवर काहीतरी करताय असे चित्र पहायला मिळते. कधी कधी वाटतं हे नव्हतं तेव्हा बरं होत, अशी भूमिका भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पुण्यात व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘मिशन यंग आणि फिट इंडिया’ या कार्यक्रमा प्रसंगी भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी घेतली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, मिनल सोहनी हे उपस्थित होते.

यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाले की, आपली एनर्जी कुठे आणि कशी खर्च करावी याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रोफेशनल स्पोर्टस् मॅन व्हावे म्हणून खेळले पाहिजे असे गरजेचे नसून, आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळलं पाहिजे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूने मेडल मिळवावे. अशी सर्वांचीच इच्छा असते. पण हे एका रात्रीत होत नाही. आपल्याकडे क्रिडा व्यवस्था हवी तशी नसल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

काही शाळामध्ये ग्राऊंड नाहीत. तर काही ठिकाणी ग्राऊंड असून देखील वापरत नाहीत. या दोन्ही गोष्टी पाहता जिथे ग्राऊंड असेल ते वापरणे गरजेचे आहे. जर मोकळी मैदाने दिसली की तिथे काही दिवसांनी या मैदानांच्या ठिकाणी वेगळेच चित्र पहायला मिळते.