शरीर सुखाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ बँक अधिकाऱ्याला पोलीस कोठडी 

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसे याला मंगळवारी खामगाव येथील न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी न्यायालयाकडून आरोपी बँक अधिकाऱ्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , मलकापूर तालुक्यातील उमाळी गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसह पीक कर्ज घेण्यासाठी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता . यावेळी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडून मोबाईल नंबर मागितला . त्यानंतर बँक अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीला कॉल करून अश्लिल संभाषण  केली आणि पीक करज देण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केली. याची तक्रार महिलेने मलकापूर पोलिसात नोंदवली होती.

[amazon_link asins=’B071QYL4H6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b33dffca-791c-11e8-8b33-1d43b8e394c0′]

या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. १०८ /१८ कलम ३५४ अ, (२),  भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू) (१), ३ (१), (डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर आरोपी बँक व्यवस्थापक राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी शिपायास दोन दिवसापूर्वीच अटक केली आहे. बँक व्यवस्थापक राजेश हिवसे यास नागपूरात पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्यास मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.