अमली पदार्थाची विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी केले उद्धवस्त

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन

मेफेड्रिन (एम. डी) या अमली पदार्थाची विक्री करणारे रॅकेट नाशिक पोलिसांनी उद्धवस्त केले आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार अरविंद कुमारला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी हा एका कंपनीत असिस्टंट सायंटिस्ट या पदावर काम करत असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याची माहीती पोलीस आयुक्त रविंद्रकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिवसेंदिवस अमली पदार्थाचा विळखा तरुणांच्या भोवती घट्ट होताना दिसतो आहे. सुरवातीला थोडसं प्रलोभन दाखवायचं आणि अलगत काॅलेजच्या तरुणांना व्यसनाच्या विळख्यात खेचायचं. एकदा का अमली पदार्थाची सवय लागली की या तरुणांकडून पैसे कमवायचे. अशाप्रकराचे अनेक रॅकेट राज्यात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मागील काही वर्षापूर्वी सोलापूरमध्ये एका कंपनीवर धाड टाकून पोलिसांनी कोट्यावधी रुपायांचे मेफेड्रिन जप्त केलं होते. त्यावेळी हिंदी चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव देखील समोर आले होते. त्यामुळे अमली पदार्थाची पाळेमुळं अगदी खोलवर असल्याचं समोर आलं होतं.