बारावी परीक्षेचा निकाल ३० मे ला जाहीर होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये २०१८ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.

निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharshtraeducation.com
http://www.knowyourresult.com
hscresult.mkcl.org
http://jagranjosh.com
www.bhasakar.com