पाणी असलेल्या परिसरात प्रलय-नैसर्गिक आपत्तीची चाहुल, ग्रहांच्या अशुभ योगाबाबत ज्योतिषी देताहेत इशारा

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ग्लेशियर तुटल्याने मोठा विध्वंस झाला आहे. ग्लेशियर तुटल्याने धौलीगंगा नदीत पूरासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि उग्ररूप धारण करून पाणी वेगाने पुढे जात आहे. अशा प्रकारच्या भयंकर नैसर्गिक प्रलयाबाबत ज्योतिषतज्ज्ञ अनेक दिवसांपासून चिंतेत होते आणि सावध करत होते. नुकतीच घडलेली घटना ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात…

गोलयोग अतिशय अशुभ
ज्योतिष तज्ज्ञांनुसार, मकर राशीत यावेळी पाच ग्रह अगोदरपासून उपस्थित आहेत. या राशीत शनी, गुरु, बुध, शुक्र आणि सूर्य अगोदरच विराजमान आहेत, परंतु 9 फेब्रुवारीला येथे चंद्रसुद्धा येणार आहे. जेव्हा एका राशीत 5 पेक्षा जास्त ग्रहांची युती होते तेव्हा यास गोलयोग म्हणतात आणि हा योग अतिशय अशुभ मानला जातो.

59 वर्षानंतर अशी स्थिती
ज्योतिष तज्ज्ञांनुसार, 59 वर्षानंतर अशी स्थिती तयार होत आहे. यापूर्वी 1962 मध्ये मकर राशीत एकावेळी सात ग्रह आले होते. तेव्हा सुद्धा देश-जग मोठ्या संकटातून गेले होते. 26 डिसेंबर 2019 मध्ये सुद्धा धनु राशीत पाच ग्रहांचा योग झाला होता आणि यानंतर संपूर्ण जगात महामारीच्या संकटातून गेले.

9 फेब्रुवारीला षटग्रह योग
आता 9 फेब्रुवारीला असाच षटग्रह योग होत आहे. ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखाद्या राशीत एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्रह येतात तेव्हा संकटाची स्थिती उत्पन्न होते. मकर राशीत सहावा ग्रह आल्याने अगोदर उत्तराखंडमध्ये ग्लेशियर तुटण्याची घटना अशाप्रकारची भविष्यवाणी खरी ठरवत आहे.

नैसर्गिक आपत्तीला प्रोत्साहन देणारा योग
जोतिष तज्ञांनी सांगितले की, मकर पृथ्वी तत्वाची रास आहे. यासाठी पृथ्वीशी संबंधीत घटना जसे की, भूकंप, बर्फवृष्टी, अचानक थंडी वाढणे, पाण्याच्या भागात पाऊस किंवा हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे. एकुण असा योग नैसर्गिक आपत्तीला प्रोत्साहन देऊ शकतो.

राजकीय क्षेत्रावर होणार परिणाम
गोलयोगचा परिणाम राजकीय क्षेत्रात सुद्धा पडतो. देशभरात सुरू असलेले शेतकरी आंदोलन तीव्र होऊ शकते. राजकीय उलथा-पालथ पहायला मिळू शकते. 9 फेब्रुवारीला न्यायाची देवता शनीचा उदय होईल. या दरम्यान महत्वाचे निर्णय येण्याची शक्यता राहील.

लोकांच्या अडचणी वाढू शकतात
14 फेब्रुवारीला जेव्ह गुरूचा उदय होईल तेव्हा पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत अडचणी वाढू शकतात. पुढील दोन महिन्यांपर्यंत स्थिती जवळपास अशीच कायम राहील. हवामान आणि राजकारणावर याचा सर्वात जास्त परिणाम पहायला मिळेल.