गूढ धक्क्यांनी हादरला कल्याण डोंबिवलीसह आसपासचा परिसर

कल्याण : पाेलीसनामा ऑनलाईन

खड्ड्यांमुळे बळी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमूळे आधीच भितीच्या सावटाखाली असणारे कल्याण डोंबिवलीकर रात्री साडेनऊच्या सुमारास बसलेल्या गूढ धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरलेले पाहायला मिळाले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हे हादरे बसले ते भूकंपाचे होते की आणखी कशाचे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 33 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 2 ते 3 मिनिटं हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी दिली. अचानक बसलेल्या या गूढ हादऱ्यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱ्यांमूळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’deaa3a37-86c4-11e8-981f-1d2c6f342569′]

याबाबत ठाणे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता या हादऱ्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे हादरे म्हणजे भूकंपाचा सौम्य धक्का होता की नुसतीच कंपनं होती ते अधिकृत माहिती आल्यानंतरच स्पष्ट होईल.