दिल्लीच्या सर्वात महाग ‘लुटियंस झोन’मध्ये आहे लक्ष्मी मित्तल यांच्यासह ‘या’ 5 उद्योगपतींचे बंगले, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   ‘लुटियंस झोन’ या भागात प्रॉपर्टी खरेदी करणं स्वप्न बघण्यासारखं असतं. दिल्लीतील ‘लुटियंस झोन’ला राजधानीतील सर्वात महागड्या आणि पॉश परिसरापैकी एक मानलं जातं. लुटियंस झोनमध्ये १ वर्ग फूट जागाही प्रीमिअम कॉस्टमध्ये मिळते. दिल्लीतील सर्वात पॉश भागात गौतम अदानीपासून ते लक्ष्मी मित्तल यांच्यापर्यंत अनेक अब्जाधिशांचे बंगले आहेत.

 1)  गौतम अदानी

सध्या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आहेत. गौतम अदानी ग्रुपने २०२० मध्ये दिल्ली लुटियंस एरियात एका लिलावात १ हजार कोटी रुपयांचा एक बंगला ४०० कोटी रुपयांना खरेदी केला होता. भगवानदास रोडवर असलेला गौतम अदानी यांचा हा बंगला ३.४ एकर परिसरात बनलेला आहे. यात ७ बेडरूम, ६ लिविंग रूम आणि डायनिंग रूमसोबतच एक स्टडी रूम आणि ७ हजार फूट स्टाफ क्वार्टरही आहे.

2)   लक्ष्मी मित्तल

जगभरात ‘स्टील किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय वंशाचे लक्ष्मी मित्तल हे सध्या ब्रिटीश नागरीक आहेत. मित्तल यांनी २००५ मध्ये लुटियंस दिल्लीमध्ये ३१ कोटी रुपये किंमतीचा एक बंगला खरेदी केला होता. आज या बंगल्याची किंमत १८० कोटी रुपये इतकी झाली आहे.

3)  सुनील वचानी

Moneycontrol नुसार, डिक्सन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक सुनील वचानी यांनी नुकताच लुटियंस दिल्लीमध्ये १७० कोटी रुपयांचा बंगल खरेदी केला आहे. वचानी यांनी गौतम अदानी यांची ही प्रॉपर्टी एक लिलावातून खरेदी केली होती.

4)  नवीन जिंदल

या यादीत उद्योगपती आणि माजी कॉंग्रेस नेते नवीन जिंदल यांचाही समावेश आहे. नवीन जिंदल लुटियंस दिल्लीमध्ये सर्वात महागड्या संपत्तीच्या मालकांपैकी एक आहेत. त्यांच्या या आलिशान बंगल्याची किंमत १५० कोटी रुपये आहे.

5) विजय शेखर

Hindustan Times च्या रिपोर्टनुसार, पेटीएमचे संस्थापक, विजय शेखर यांनी लुटियंस दिल्लीच्या द गोल्फ लिंक्स भागात साधारण ६ हजार वर्ग फूट जागेवरील हा बंगला ८२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. हा बंगला गोल्फ लिंक्स त्या १ हजार बंगल्यांपैकी एक आहे जे ३ हजार एकर जागेत बांधले आहेत.