‘या’ अकरा जणांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र विधानपरिषदेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा विधानपरिषद सदस्य म्हणून निर्वाचित झालेल्या अकरा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही शपथ दिली. यात पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांच्यासह विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत प्रभाकर पाटील, ॲड. अनिल परब, शरद रणपिसे, अब्दुल्लाखान अ.लतिफ खान ऊर्फ बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा यांचा समावेश आहे.

[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ae738e6-949c-11e8-9ce7-13dbe23f0b78′]

विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झालेल्या या शपथविधी समारंभाला सभापती, माजी उपसभापती, माणिकराव ठाकरे, प्रधान सचिव, डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, उपसचिव, विलास आठवले, ऋतुराज कुरतडकर आदी उपस्थित होते.

विधानपरिषद हे राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेवर ७८ सदस्य आहेत. विधानपरिषदेवरील एक तृतीयांश सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७१ (3)(घ) अन्वये या सदस्यांना शपथ देण्यात येते