हे शहर आपले असून स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे : आयुक्त हर्डीकर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

स्वच्छ भारत अभियान (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शहराच्या मानांकनात प्रगती होण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी सेवाभावी संस्था, बचतगट, विद्यार्थी, नागरिक या सर्वांनी सहभागी होऊन तयारीनिशी या सर्वेक्षणात सहभागी व्हावे”
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e91cd63e-a86e-11e8-a3a4-e1cbd72314d3′]

“स्वयंमूल्यांकना बरोबर नागरिकांचा सहभाग वाढवणे हे या सर्वेक्षणात अभिप्रेत आहे. हे शहर आपले आहे याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे ही भावना रुजवली पाहिजे” असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

केंद्र शासनामार्फत स्वच्छतेबाबत देशांतील शहरांचे दरवर्षी मूल्यमापन केले जाते. स्वच्छ भारत अभियान (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत महापालिकेने जानेवारी २०१९ सर्वेक्षण पूर्वतयारी करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,” ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१४ साली सुरु झाले..२०१९ मधील सर्वेक्षणातील प्रक्रिया, तंत्रज्ञान यामध्ये फरक झालेला आहे. याचा अभ्यास केला पाहिजे. स्वच्छता ही एक लोकचळवळ व्हावी हा उददेश या अभियानाचा आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पण व सेवाभावाने स्वच्छ सर्वेक्षणाचे ध्येय पूर्ण करुन जनमानसात स्वच्छता रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे शहर आपले आहे याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे ही भावना रुजवली पाहिजे” असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत विभाग निहाय मूल्यांकनाबाबत सेवा स्तरावरील प्रगती, थेट निरीक्षण, नागरिकांच्या प्रतिक्रिया, प्रमाणपत्र यासाठी असलेले गुणांक यांची सविस्तर माहिती दिली.
[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f220b9d1-a86e-11e8-b1ae-99e065225902′]

या कार्यशाळेस शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, आयुबखान पठाण यांचेसह क्षेत्रीय अधिकारी मंगेश चितळे, संदीप खोत, अण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, समग्र संस्था, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे तांत्रिक तज्ञ निनाद भागवत, भूषण देशमुख, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये काम करणारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तसेच इंदापुर, कराड, जयसिंगपुर, दहिवडी, लोणावळा, दौंड, जुन्नर, कागल व मुरगुड नगरपरिषद, पुणे, सांगली महानगरपालिका यांचे अधिकारी, सहा आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य ‍निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, जलनि:सारण, विदयुत व स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

इतर बातम्या

जुन्याच सायकल ‘शेरिंग’ सेवेचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते नव्याने उदघाटन

आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल