कोरोनाच्या संपूर्ण कुटुंबाचा ‘खात्मा’ करणार ‘ही’ व्हॅक्सीन ! पुढील वर्षी होऊ शकते मनुष्यावर ट्रायल

नॉर्थ कॅरोलिना : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्ध यश मिळाल्यानंतर आता व्हेरिएंट्स (Corona Variants) चा धोका दिसू लागला आहे. महामारीच्या सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरस सतत आपले रूप बदलत आहे. यावर काही अमेरिकन शास्त्रज्ञांनी बचावासाठी खास व्हॅक्सीन डिझाईन केली आहे. ही व्हॅक्सीन SARS-CoV-2 सह इतर कोरोना व्हायरसविरुद्ध सुद्धा सुरक्षा देईल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पीटीआयच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या संशोधकांना आढळले की, 2003 मध्ये सार्स आणि कोविडमुळे तयार झालेला कोरोना व्हायरसचा धोका नेहमी राहील. अशावेळी संशोधकांनी एक नवीन व्हॅक्सीन तयार केली आहे. सध्या या व्हॅक्सीनची ट्रायल उंदरांवर करण्यात आली आहे. यातून निष्कर्ष प्राप्त झाले की, व्हॅक्सीनने उंदरांना कोविड-19 आणि इतर कोरोना व्हायरसपासून सुद्धा वाचवले.

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित स्टडीत सेकंड जेनरेशन व्हॅक्सीनवर लक्ष दिले, जी सरबेकोव्हायरसला निशाणा बनवते. सरबेकोव्हायरस, कोरोना व्हायरसच्या मोठ्या कुटुंबाचा भाग आहे.
सोबतच तो सार्स आणि कोविड-19 पसरवल्यानंतर वायरोलॉजिस्ट्ससाठी आवश्यक बनला आहे.
तज्ज्ञ या व्हायरसवर प्राधान्याने काम करत आहे.
विशेष म्हणजे टीमने यामध्ये mRNA चा वापर केला आहे, जी फायजर आणि मॉडर्ना व्हॅक्सीनप्रमाणे आहे.

मात्र, यामध्ये केवळ एका व्हायरससाठी mRNA कोड टाकण्याऐवजी त्यांनी अनेक कोरोना व्हायरसच्या mRNA सोबत जोडले आहे.
उंदरांना ही हायब्रिड व्हॅक्सीन दिली असता, तिने परिणामकारक पद्धतीने वेगवेगळ्या स्पाईक प्रोटीन्सविरूद्ध न्यूट्रलायजिंग अँटीबॉडीज तयार केली.
संशोधकांना आशा आहे की, पुढे आणखी टेस्टिंगनंतर ही व्हॅक्सीन पुढील वर्षी मानवी ट्रायल्ससाठी आणली जाऊ शकते.

यूएनसी गिलिंग्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये एक पोस्ट डॉक्टरल रिसर्चर डेव्हिड मार्टिनेज यांनी म्हटले, आम्हाला मिळालेले यश भविष्यासाठी उज्ज्वल दिसत आहे.
काहरण सक्रिय प्रकारे व्हायरसविरूद्ध सुरक्षा देण्यासाठी आम्ही आणि यूनिव्हर्सल पेन कोरोना व्हायरस तयार करू शकतो. मार्टिनेज स्टडीचे प्रमुख लेखक सुद्धा आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : this vaccine may kill the entire family of coronavirus successful test on rates

हे देखील वाचा

‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशीविजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

Social Activist Anjali Damania । ‘फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसले यांच्यावर कारवाई?’

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…