Tiger Shroff | टायगर श्रॉफच्या आयुष्यात आली पुन्हा ‘दिशा’; पण ती दिशा पाटनी नसून आहे दुसरीच

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या हिरो हिरोईन्सच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा तर सतत रंगत असतात. यामध्ये लोकप्रिय कपल होते अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) व अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani). टायगर आणि दिशा यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रिन जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत होती. मात्र त्या दोघांचे ब्रेकअप झाले असल्याचे उघड झाले आणि हे कळताच अनेक चाहते नाराज देखील झाले. आता मात्र टायगर श्रॉफला (Tiger Shroff) नवीन दिशा मिळाली असून आता त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेता टायगर श्रॉफच्या बॉडी, लूक्स आणि डान्सवर अनेक तरुणी घायाळ आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग असून टायगरच्या अफेअरबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. टायगर श्रॉफ (Tiger Shroff Date) हा दिशाला डेट करत असल्याचे समोर येत आहे. मात्र ही दिशा ही अभिनेत्री दिशा पाटनी नसून दिशा धनुका (Deesha Dhanuka) आहे. टायगर आणि दिशा धनुका (Tiger Shroff And Disha Dhanuka) हे सध्या त्यांचे सिक्रेट रिलेशन एन्जॉय करत आहेत. दिशा ही चित्रपटसृष्टीशी निगडित असून अद्याप त्यांनी आपले नाते जाहीर केलेले नाही.

काही दिवसांपूर्वी टायगर व दिशा पाटनी यांना एका इव्हेंटमध्ये एकत्र पाहून त्यांचे पुन्हा एकदा पॅचअप झाले असल्याचे बोलले गेले. मात्र त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या असून आता टायगर दिशा धनुका हिला डेट करत आहे. ते दोघे अनेकदा क्वालिटी टाईम स्पेंड करत असून नुकतेच ते लंडनला लॉन्ग व्हेकेशनवर गेले होते.

टायगर श्रॉफची (Tiger Shroff) गर्लफ्रेंड दिशा धनुका ही बॉलीवुडशी (Bollywood News) निगडित आहे.
तिने पूजा एंटरटेनमेंट प्रोडक्शनमध्ये (Pooja Entertainment Production) काम केले आहे.
तसेच जॅकी म्युझिक लेबलसाठीही काम केले आहे. दिशाचे कलकत्ता येथून ग्रॅज्युकेशन पूर्ण झाले आहे.
सध्या ती टायगर श्रॉफसाठी काम करत आहे. दिशाचा 2018 साली घटस्फोट झाला असून तिचे पूर्वाश्रमीचे नाव
दिशा जैन होते. सोशल मीडियावर तिचे अकाउंट प्रायव्हेट असून तिचे इंस्टाग्रामवर 11 हजार फॉलोवर्स आहेत.
बॉलीवुडच्या अनेक प्रसिद्ध लोक तिला फॉलो करत आहेत. दिशा धनुका ही सध्या टायगर श्रॉफ सोबत असणाऱ्या रिलेशनशिपमुळे (Tiger Shroff Relationship) चर्चेत आली असून ते दोघे आता एकत्र काम करत आहेत.
टायगर श्रॉफ लवकरच ‘गणपथ’ या चित्रपटामध्ये (Ganapath Movie) झळकणार असून यामध्ये तो आणि
अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | पर्वती भागात दहशत माजविणाऱ्या बिपीन मापारी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 45 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Keshav Upadhye In Pune | भाजपातर्फे 14 ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार; नागरिकांच्या सहभागाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन