तेलकटपणामुळे केसांत होऊ शकतो कोंडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केसातील अतिरिक्त तेल व्यवस्थित निघून जाईपर्यंत केस स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कारण केसात तेल राहिल्याने धूळ, धूर, इतर प्रदूषणजन्य घटक केसात चिकटून राहतात. त्यामुळे स्काल्पजवळील पोर्स बुजतात आणि हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात. परिणामी केस गळू लागतात. तेलकट स्काल्पमुळे केसांत कोंडा होतो व केस गळू लागतात. खूप तेल लावल्याने स्काल्पमधील नैसर्गिक तेलाशी त्याचे संतुलन साधले जात नाही. त्यामुळे केस कमकुवत होऊन अधिक खराब होऊ लागतात.

केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी केसांना नियमित तेल लावले पाहिजे. यामुळे, धूळ, प्रदूषण यांपासून केसांचे संरक्षण केले पाहिजे. परंतु, जेव्हा तेल लावल्यावर केस गळतात, असा अनुभव काहींना येतो. तेलामुळे केस मजबूत होतात. त्यांचा फ्रिझीनेस कमी होतो आणि केस तुटण्याला आळा बसतो. पण यामुळे केस गळूदेखील लागतात. एका हेअर फॉलिकलमधून १-६ वर्षे केस वाढू शकतात. म्हणून जुने केस गळून नवीन येणे ही सातत्याने होणारी प्रक्रिया आहे.

केसांना तेल लावताना काही वेळ केसांना मसाज करावी. अशा वेळी केस गळणे काहीसे स्वाभाविक असते. परंतु, केस गळण्याचे प्रमाण अधिक असल्यास हे काळजीचे कारण असू शकते. केसातील अतिरिक्त तेल व्यवस्थित निघून जाईपर्यंत केस स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कारण केसात तेल राहिल्याने धूळ, धूर, इतर प्रदूषणजन्य घटक केसात चिकटून राहण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे स्काल्पजवळील पोर्स बुजतात आणि हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात. परिणामी केस गळू लागतात. तेलकट स्काल्पमुळे केसांत कोंडा होतो व केस गळू लागतात. तसेच खूप तेल लावल्याने स्काल्पमधील नैसर्गिक तेलाशी त्याचे संतुलन साधले जात नाही. त्यामुळे केस कमकुवत होऊन अधिक खराब होऊ लागतात. केसांना मसाज करताना स्काल्पला हळुवार मसाज केला पाहिजे. खूप जोरजोरात मसाज केल्याने केस गळू शकतात. तेल लावल्यानंतर केसातील तेल निघून जाईल अशा पद्धतीने स्वच्छ केस धुतले पाहिजे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like