जगमोहन दालमिया यांची मुलगी वैशाली यांना TMC ने दाखविला बाहेरचा रस्ता

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय मैदानात एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) आपल्याच पक्षाच्या आमदारावर कारवाई केली आहे. टीएमसीच्या शिस्त समितीच्या बैठकीत आमदार वैशाली दालमिया यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. दरम्यान, वैशाली या बीसीसीआयचे माजी प्रमुख जगमोहन दालमिया यांची कन्या आहे. अलीकडे वैशाली यांनी भ्रष्टाचारासह सर्व बाबींवर पक्षाला प्रश्न विचारला होता. त्यांच्याविरोधात पक्षाने केलेल्या कारवाईबाबत, बल्ल्ली सीटच्या आमदार वैशाली म्हणाल्या की, दलबदलू पक्षातच राहतात, पक्षनेतृत्वावर व्यंगात्मक टीका करतात. परंतु पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिक नेत्यांविरोधात कारवाई करीत आहे. यावेळी वैशाली यांनी मंत्री राजीव बॅनर्जी यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केला. आपण आमदारपद सोडणार नाही किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच त्यांनी स्वत: च्या पक्षाविरोधात मोर्चा उघडला होता. वैशाली म्हणतात की, भ्रष्टाचारामुळे टीएमसीचे नुकसान होत आहे, जमिनीवरील भ्रष्टाचार पक्षाला दीमक सारखा संपवत आहे. टीएमसीच्या आमदाराचे म्हणणे आहे की, त्यांच्या मतदारसंघात बराच भ्रष्टाचार होत आहे, अनेक वर्षांपासून ती याबाबत आवाज उठवत आहे. भ्रष्टाचाराबद्दल आपले मत त्यांनी आधीच सीएम ममता बॅनर्जी यांना सांगितले आहे. उल्लेखनीय आहे की पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये गोंधळ उडाला आहे. नुकताच ममता सरकारमधील मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर वैशाली म्हणाल्या होत्या की, भ्रष्टाचारासारख्या कारणांमुळे लक्ष्मी रतनसुद्धा पक्षात काम करू शकत नाही आणि त्यांनी राजीनामा दिला.

वैशाली यांनी म्हंटले कि, घर, रस्ता किंवा इतर कोणत्याही कामांसाठी कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही. प्रशांत किशोर यांच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हंटले कि, आपण भ्रष्ट लोकांना पक्षात मोठी पदे देतात. अशा परिस्थितीत टीएमसीने आज शिस्त समितीची बैठक बोलावली आणि वैशाली डालमिया यांना पक्षातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीला गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्वात आधी शुभेंदू अधिकारी यांनी पक्ष सोडला आहे. त्यानंतर इतर अनेक आमदार व नेत्यांनी पक्षाविरोधात मोर्चा उघडला आहे.