3 दिवसानंतर SMS सर्व्हिस बंद होऊन कोणताही OTP येणार नाही ? TRAI ने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स बिजनेस युनिट्सना आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कमर्शियल एसएमएस (SMS) पाठवण्यासाठी टेलिमार्केटिंग नियमांचं पालन करण्यासाठी तीन दिवसांच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिली आहे. तीन दिवसात नोंदणी केली नाही तर कंपन्यांवर त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल एसएमएस पाठवण्यावर बंदी घातली जाणार आहे.

ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने सांगितले आहे की, या कंपन्यानी ट्रायचे नियम पाळले नाही तर तीन दिवसांनंतर बँक, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स कंपन्याकडून येणारे कमर्शियल एसएमएस बंद होतील. यामुळे ग्राहकांना बँक, शॉपिंग आणि इतर कामामध्ये समस्या येऊ शकतात. स्पॅम मेसेज आणि ऑनलाईन फ्रॉडवर लगाम घालण्यासाठी नवीन एसएमएस रेग्युलेशन लागू करण्यात आल्याचे ट्रायने सांगितले आहे.

कंपन्यांना तीन दिवसांचा कालावधी

ट्रायने सांगितले आहे की, ज्या कंपन्यांनी या रेग्युलेशनला अद्याप फॉलो केले नाही, अशा कंपन्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत कंपन्यांनी नव्या नियमांनुसार रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल. ज्या कंपन्या तीन दिवसात नव्या नियमांना फॉलो करणार नाहीत अशा कंपन्यांचे नाव डिफॉल्टर कंपनी म्हणून कंपनीच्या वेबसाईटवर पोस्ट केले जाईल.

8 मार्चपासून OTP येणं बंद झालं

एसएमएस सेवेत अडचणी आल्याने ई-कॉमर्स, बँका आणि इतर कंपन्यांना एसएमएस येण्यास वेळ लागत होता. ही अडचण एखाद्या नेटवर्क किंवा अॅपवर नव्हती तर अनेक ठिकाणी होती. CoWIN रजिस्ट्रेशन ओटीपी, डेबिट कार्ड ट्रान्झेक्शनसाठी बँक ओटीपी तसेच सिस्टम बेस्ड टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ओटीपी (OTP) येण्यास वेळ लागत होता.

नव्या रेग्युलेशन नियमांमुळे फ्रॉडवर लगाम लावला जाईल, यासाठी नवीन रेग्युलेशन लागू करण्यात आले आहेत. मात्र, नव्या एसएमएस रेग्युलेशन लागू केल्यापासून अनेक समस्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ट्रायने सात दिवसांसाठी नवे नियम सस्पेंड केले. नव्या नियमांमुळे ओटीपी आणि एसएमएस संबंधी समस्या येऊ लागल्यानंतर ट्रायने हा निर्णय घेतला. तसेच कंपन्यांना नवीन फ्रेमवर्कचा अवलंब करण्यासाठी आणखी सात दिवसांचा कालावधी दिला होता.

नेमकं काय आहे प्रकरण ?

दिल्ली हायकोर्टाने ट्रायला आदेश दिले होते की, फ्रॉड, खोट्या SMS वर तात्काळ रोख लावावेत. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची यामध्ये फसवणूक होणार नाही. कोर्टाच्या आदेशानंतर कोर्टाचे आदेश पूर्ण करण्यासाठी ट्रायने नवी DLT स्टिटम सुरु केली. या नव्या सिस्टममध्ये रजिस्टर्ड टेम्पलेटवाल्या प्रत्येक एसएमएसच्या कॉन्टेंटला वेरिफाय केल्यानंतरच डिलिवर केले जाईल. या सर्व प्रक्रियेला स्क्रबिंग असे म्हणतात. ही प्रक्रिया यापूर्वी अनेकवेळा लागू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर 8 मार्च पासून ही प्रक्रिया लागू करण्यात आली.

8 मार्चला काय घडलं ?

देशभरातील लोकांना 8 मार्चला एसएमएस आणि ओटीपी येण्यास उशीर लागत असल्याचे जाणवले. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, ई-कॉमर्स सर्व्हिसेससह कोविड लसीकरणासाठी अवश्यक असलेले को-विन अ‍ॅपवरील नोंदणी सेवा देखील ठप्प झाली होती. त्यामुळे लाखो लोकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. सोमवार सकाळपर्यंत 40 टक्के एसएमएस आणि ओटीपी सेवा विस्कळीत झाली होती. या नंतर यामागे घातपात असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र नंतर टेलिकॉम कंपन्यांनी व्यावसायिक जाहिरातीच्या एसएमएसबाबतच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु केली असल्याने याचा परिणाम एसएमएस सेवेवर झाल्याचे उघड झाले.

बँकिंग व्यवहार ठप्प

ट्रायच्या नव्या रेग्युलेटरीमुळे अनेकांना याचा फटका बसला. ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या बल्क एसएमएस बाबात लागू करण्यात आलेल्या नव्या निकषांची अंमलबजावणी करण्यास ट्रायने सांगितल्याने याचा परिणाम ओटीपीसाठी लागणाऱ्या एसएमएस सर्व्हिसवर झाला. लाखो लोकांना बँकेचे व्यवहार करताना ओटीपी मिळू शकला नाही. याचा परिणाम बँकिंग व्यवहारावर मोठ्या प्रमाणात झाला. बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर ठप्प झाले.