17 मार्च राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक ‘लाभ’, ग्रह-नक्षत्रांनी दिले ‘संकेत’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भाग्य आज कामात यश देईल. नोकरीत केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. घरापासून दूर राहाल, पण कामात मन रमेल, काम चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला आपली मन की बात सांगणे सोपे जाईल. यामुळे नाते अधिक चांगले होईल. व्यापारासाठी दिवस सामान्य आहे.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस कमजोर आहे. अचानक होणारे खर्च त्रास देतील. विनाकारण प्रवास केल्यास धनहानी होईल. मानसिक ताण वाढेल. आरोग्य थोडे कमजोर राहिल. वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती राहील. प्रेमसंबंधात सावध राहा. एकमेकांबद्दल गैरसमज होऊ शकतो. भाग्याची साथ मिळाल्याने काही कामे होतील आणि नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील.

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिस चांगला आहे. व्यापारात केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि अपेक्षेप्रमाणे फायदा होईल. वैवाहिक जीवनात तणाव असला तरी जोडीदार साथ देईल आणि यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील वातावरण कमजोर राहील. कामात मजबूती वाढेल आणि तुमचे कौतूक होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रेमात वाढ होईल.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस कमजोर आहे. खर्च अचानक वाढल्याने त्रास होईल. मानसिक तणाव सुद्धा वाढेल आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कर्ज घेण्याचे योग आहेत, थोडे सावध राहा. संततीसाठी दिवस चांगला आहे अणि वैवाहिक जीवनासाठीही दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात तणावाचा सामना करावा लागेल. नोकरीत मेहनतीला यश मिळेल.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. कामात यश मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. यामुळे मन आनंदीत होईल. प्रेमसंबंधात यश लाभेल, परंतु नात्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्या विरोधकांवर मात कराल. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. नोकरीत बदलीचे योग आहेत. व्यापारात यश मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाकडे लक्ष द्याल. त्यांच्या गरजा समजून घ्याल. घरगुती खर्च वाढतील. एखादी संपत्ती मिळू शकते. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमजोर आहे. वादाची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस कमजोर आहे. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यापारासाठी सुद्धा आजचा दिवस कमजोर आहे. आरोग्य सुद्धा आज कमजोर राहील.

तूळ
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. वैयक्तिक आयुष्यासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल. प्रेमसंबंधात आज आनंद लाभेल. एकमेकांशी बोलून मन हलके कराल. कुटुंबात तणाव वाढले. उत्पन्नात घसरण होऊ शकते. कामात अधिक मेहनत करावी लागेल. प्रवासाठी दिवस चांगला नाही.

वृश्चिक
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. उत्पन्नात थोडी वाढ झाल्याने मन थोडे हलके होईल. कुटुंबात तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून गहन चर्चा होईल. कुटुंबाची साथ द्याल. वैवाहिक जीवनात तणाव राहिल. जोडीदारामुळे खर्च वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. नोकरीत स्थिती कमजोर राहिल. नोकरी बदलण्याचे विचार मनात येतील. व्यापारही आज थोडा कमजोर राहील.

धनु
आज संमिश्र परिणाम मिळतील. आरोग्य कमजोर राहील. तुम्ही आजारी पडू शकता. मनात एकाच वेळी अनेक कामे चालतील. ज्यामुळे कामात यश मिळण्यास उशीर होईल. कुटुंबात वातावरण गरम राहील, ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. वाद होऊ शकतो. कामात दुसर्‍यांसोबत चांगले वागलात तर पुढे जाता येईल. तेव्हाच यश मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठाची प्रकृती बिघडू शकते.

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढतील, ज्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, परंतु ते अशक्य झाल्याने अडचणी वाढतील. उत्पन्न कमी राहील. कुटुंबातील लोक साथ देतील. कुटुंबातील प्रेम वाढेल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करू शकाल. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. विरोधकांपासून सावध राहा.

कुंभ
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अनेक मार्गाने उत्पन्न मिळेल. प्रेमात चढ-उताराची स्थिती राहील. तुमची प्रिय व्यक्ती कधी प्रेमात तर कधी रागात राहील. वैवाहिक जीवनासाठी दिवस दिवस चांगला आहे. जोडीदराचे सहकार्य मिळेल. आरोग्य कमजोर झाल्याने आजारी पडण्याचे योग आहेत. प्रवास आरामदायी असेल. कामात चांगले परिणाम मिळतील. व्यापारात धनप्राप्ती होईल.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. कुटुंबाकडून एखादी मोठी चिंता लागू शकते. कुटुंबातील एखाद्याच्या प्रकृतीविषयी चिंता सतावू शकते. उत्पन्न हळूहळू वाढेल. कामात प्रयत्न सार्थकी लागतील. काही लोकांची साथ घेऊन तुम्ही आपल्या कामाला गती द्याल. व्यापारासाठी दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढतील. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनात काही चांगले परिणाम मिळण्याची आशा आहे.