19 मार्च राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या लोकांना आज होणार ‘धनलाभ’, महत्वपूर्ण आहे गुरूवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात अधिक लक्ष द्याल, यामुळे जास्त व्यस्त राहाल. सुख सुविधांमध्ये वाढ होईल. धनप्राप्ती होईल. ज्येष्ठांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे दिवस चांगला जाईल. आरोग्यात चढ-उतार राहिल. वैवाहिक जीवनासाठी दिवस खुप चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. आडलेली कामे मार्गी लागतील. आज एखादा धार्मिक गुरू किंवा ज्ञानी पुरूषाची भेट होईल, जो तुम्हाला खुप मदत करेल. त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. कामात प्रवास करावा लागेल. काही लोकांची बदली सुद्धा होऊ शकते. कुटुंबाचे वातावरण खुप चांगले राहिल. वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन
आजचा दिवस खुप चांगला आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. कामात केलेल्या प्रयत्नांमुळे उशीर होऊ शकतो. यामुळे मनधैर्य थोडे कमी होईल. परंतु, तुमच्याकडून काही काम नक्की होईल. कौटुंबिक जीवन ठिक राहील. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जी तणावाची स्थिती सुरू होती, तिच्यापासून आज मुक्ती मिळेल. प्रेमसबंधासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात यश मिळेल. आरोग्य कमजोर राहू शकते. जोडीदारावर जास्त पैसे खर्च कराल, यामुळे तो खुश होईल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे आणि संमिश्र फळ मिळेल. आज आपल्या प्रिय व्यक्तीशी कोणतीही अयोग्य चर्चा करू नका. कामात आजचा दिवस तुमच्या बाजूने राहील. मेहनतीचे चांगले परिणाम दिसून येतील.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र अनुभव देणारा आहे. आरोग्य चांगले राहील, परंतु अचानक सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो, किंवा एखादी शारीरीक वेदना त्रस्त करू शकते. प्रॉपर्टीच्या प्रकरणात लाभ होईल. वैवाहिक जीवन चांगले चालेल, यामुळे आनंदी राहाल. प्रेमबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वागण्यात धार्मिकता वाढेल. कामात बढती मिळण्याचे योग आहेत.

कन्या
आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. प्रिय व्यक्ती तुम्हाला एखादी अशी गोष्ट बोलू शकते, ज्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगलाआहे, जोडीदार आपल्या जबाबदार्‍या पार पाडेल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. कामात चांगले परिणाम दिसून येतील.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र अनुभव देणारा आहे. तुमचे पूर्ण लक्ष कुटुंबाकडे राहील. कुटुंबातील ज्येष्ठाची प्रकृती बिघडू शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कामाचे कौतूक होईल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्ती मनातील गोष्टी तुमच्याकडे बोलून दाखवेल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी कमजोर आहे. प्रकृती बिघडू शकते. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. प्रवास त्रासदायक होऊ शकतो. कामात सहकार्‍यांशी वाद होऊ शकतो, यामुळे काम बिघडू शकते. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. अचानक तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. वैवाहिक जीवनासाठी दिवस खुप चांगला आहे. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील.

धनु
आजचा दिवस संमिश्र अनुभव देणारा आहे. खर्चात वाढ होईल. पण उत्पन्न वाढल्याने जास्त त्रास होणार नाही. वैवाहिक जीवनात चांगले अनुभव मिळतील आणि तुमचा जोडीदार काही चांगल्या गोष्टी बोलेल, ज्यामुळे आनंद लाभेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. एखाद्या मित्राकडून प्रेमभावना जाणवतील. कामात आज खुप मेहनत करावी लागणार आहे.

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. मानसिक तणाव वाढेल आणि आरोग्य कमजोर राहील. धार्मिक कार्यात जास्त खर्च कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस खुप चांगला आहे. कुटुंबाच्या बाबतीत एखादा मोठा निर्णय घ्याल. कामात आजचा दिवस लाभाचा राहणार आहे.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. खर्चात वाढ होईल. पैशांची गुंतवणूक टाळणेच तुमच्यासाठी आज योग्य आहे. कामासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमची मेहनत तुमच्यासाठी चांगले फळ घेऊन येईल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील आणि आनंद देईल. विवाहितांसाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रेमप्राप्ती सुद्धा होईल. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. तुम्हाला धनलाभ होईल. खर्च कमी होतील. भाग्याची साथ लाभेल. आरोग्य चांगले राहील. तुम्ही चांगल्या कामावर खर्च कराल, पण तो जास्त असणार नाही. कुटुंबाचे वातावरण थोडे त्रासदायक राहील. कामात चांगले परिणाम मिळतील आणि कामाचे कौतूक होईल.

You might also like