9 मार्च राशीफळ : होळी दहनाच्या दिवशी ‘या’ राशींचे बदलणार ‘नशीब’, होईल ‘धन’लाभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात चढ-उतार राहिल. नोकरी बदलण्याचे विचार मनात येतील. व्यापारात उत्तम धनलाभाचे योग आहेत. प्रेमसंबंधात आज रोमँटीक मूडमध्ये राहाल आणि आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहाल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. कामात यश मिळवण्यासाठी भाग्याची साथ मिळेल. एखाद्या वरिष्ठाचा सल्ला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल आणि तुम्ही आनंदाने पुढे जाल.

वृषभ
आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबात सुख मिळेल. घरातील लोक सहकार्य करतील, त्यामुळे कामात चांगली संधी लाभेल. कामात सहकार्‍यांशी चांगले वागल्यानेच तुम्हाला यश मिळू शकते. दाम्पत्य जीवनात तणावापासून मुक्ती मिळू शकते. प्रेमसंबंधात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. अचानक लाभ होऊ शकतो.

मिथुन
आजचा दिवस खुप चांगला आहे. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल आणि जोडीदाराशी चांगले संबंध होतील. तुम्हाला तुमच्या आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अनेक कामे करण्याची इच्छा होईल, ज्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकारीत यश मिळेल आणि एखाद्या प्रवासाला जाण्याचा योग येईल. सामान्यप्रमाणात धनप्राप्ती होईल शकते.

कर्क
तुमच्यासाठी दिवस सामान्य आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्रस्त होऊ शकता. उत्पन्न थोडे वाढेल, ज्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते. बचतसुद्धा होऊ शकते. कुटुंबाकडे लक्ष द्या आणि घरगुती खर्च कराल. कामात विरोधकांचा सामना करावा लागेल. परंतु, तुम्ही तुमच्या कामाच्या बळावर त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकता. प्रेमसंबंधात दिवस आनंदी राहिल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस खुप चांगला आहे.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. आज प्रत्येक काम मजबूतीने करू शकता. मन आनंदीत होईल, कारण कामात यश मिळणार आहे. भविष्याबाबत विचार कराल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस चांगला आणि आणि एकमेकांना समजून घ्याल. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील. आज तुम्ही कोणत्याही आव्हानांना घाबरणार नाही. नोकरी करत असाल तर चांगले परिणाम दिसून येतील.

कन्या
आजचा दिवस चढ-उताराचा आहे. कुटुंबातील वातावरण अस्वस्थ करेल आणि मानसिक तणाव वाढेल. संततीकडून चांगली बातमी समजेल, ज्यामुळे वातावरण थोडे चांगले होऊ शकते. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्तीसोबत बोलण्याची आणि प्रेमव्यक्त करण्याची संधी मिळले. उत्पन्नात घसरण होऊ शकते, परंतु कामाचे कौतूक होईल. आरोग्य चांगले राहिल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस सामान्य राहिल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. तुमचे उत्पन्न सुद्धा वाढेल. कुटुंबाचे वातावरण आनंद देईल. एकमेकांची काळजी घ्याल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील आणि प्रिय व्यक्ती आपल्या बोलण्याने तुम्हाला खुश करेल. विवाहितांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबातील छोट्यांचे आरोग्य बिघडू शकते. कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुमचे लक्ष कामात आणि सोबतच्या लोकांवर राहू द्या.

वृश्चिक
आजचा दिवस खुप चांगला आहे. लक्षपूर्वक काम केल्यास यश निश्चित मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागल्याने आनंद वाटेल. कुटुंबातील लोक तुमच्या बाजूने उभे राहतील. नात्यांमध्ये आपलेपणा वाढेल. धनप्राप्तीचे योग बनत आहेत. विवाहितांच्या जीवनात तणाव वाढू शकतो, यासाठी थोडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा आहे. थांबलेली कामे मार्गी लागतील, ज्यामुळे मन आनंदीत होईल. तुम्हाला उत्पन्नही चांगले मिळेल. कुटुंबातील लोकांशी चांगले वागा. जेवणाकडे लक्ष द्या, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. विवाहितांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात चढ-उताराची स्थिती राहिल. प्रिय व्यक्तीचा मूड कधी चांगला, कधी वाईट असा राहिल.

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. तुम्ही आजारी पडू शकता, यासाठी आरोग्याची काळजी घ्या, खर्चातसुद्धा वाढ होईल. यामुळे मानसिक दबाव येईल. कामात चांगले परिणाम दिसून येतील आणि तुमच्या कामाचे कौतूक होईल. बॉससुद्धा खुश होईल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि आज पैसे गुंतवण्यासाठी चांगला दिवस आहे. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराशी चांगले बोलाल. प्रेमसंबंधात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही जास्त मेहनत करा, कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुमचे उत्पन्न वाढेल आणि काही नवीन संधीही तुमच्या हाती लागू शकतात. या संधीमुळे भविष्यात फायदा होईल. प्रेमसंबंधात आज सुख मिळेल. विवाहितांसाठी आजचा दिवस प्रेममय आहे. प्रत्येक काम मजबूतीने करा, ज्यामुळे यश मिळेल.

मीन
आजचा दिवस चढ-उताराचा आहे. आज तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे विरोधक मजबूत होतील. भाग्याची थोडी साथ मिळेल, ज्यामुळे जीवनात पैशांची आवक होईल. आरोग्य कमजोर राहिल, आजारी पडू शकता. घरातील ज्येष्ठांचे आरोग्यसुद्धा बिघडू शकते. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील. विवाहितांना जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात सुधारणा होईल.