Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आज वायदा व्यापारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामध्ये सोन्याच्या दरात 97 रुपयांची घसरण होऊन सोने 48,377 रुपये प्रतितोळा झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जूनमध्ये वायदा सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी कमी झाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जुलै, 2021 मध्ये चांदीचा भाव 526 रुपये म्हणजे 0.72 टक्क्यांची तेजीसह 73,850 रुपये प्रतिकिलो झाला आहे. याने जुलै कॉन्टॅक्टच्या चांदीचा भाव 73,324 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये चांदीचा भाव 499 रुपये म्हणजे 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 74,870 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत होता. सप्टेंबर, 2021 मध्ये चांदीचे दर 74,371 प्रति किलो रुपयांवर गेले होता.

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचा भाव काय ?

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कॉमेक्सवर जून, 2021 मध्ये सोन्याचा भाव दोन डॉलर म्हणजे 1.11 टक्केच्या तेजीसह 1869.60 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 3.64 डॉलर म्हणजे 0.19 टक्क्यांच्या तेजीसह 1870.54 डॉलर प्रति औंसवर सुरु होता. Comex वर जुलै 2021 मध्ये चांदीची किंमत 0.42 डॉलर म्हणजे 1.49 टक्क्यांच्या तेजीसह 28.70 डॉलर प्रति औंसवर सुरु होता.