अमृतसर रेल्वे दुर्घटना : रेल्वे ड्रायव्हरचा मोठा खुलासा

अमृतसर : वृत्तसंस्था –अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी एक धक्कदायक घटना घडली. रावणदहन पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने चिरडले. शुक्रवारी रात्री जालंधरहून अमृतसरच्या दिशेने भरधाव वेगात ही रेल्वे जात होती. या घटनेने पूर्ण देश हादरूव गेला आहे. यात 61 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त यात जखमी झाले आहेत. या घटनेचा एक मोठा खुलासा झाला आहे. सर्वांचा मृत्यू बनून आलेल्या रेल्वेच्या ड्रायव्हरने आता मोठा खुलासा केला आहे. सध्या ड्रायव्हरला पोलीसांनी अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे.

जेव्हा रेल्वेची दुर्घटना घडली तेव्हा, बरेच लोक हे जोडा रेल्वेफाटकाजवळ असणाऱ्या रेल्वे रूळावर उभे राहून लोक रावणदहन पाहत होते. यावेळी चांगलाच अंधार पडला होता. दुसरीकडे रावणदहन सुरु होते त्यामुळे वातावरणात धुराचे प्रमाणही खूप होते. जोरात आतिषबाजी सुरू होती. याच दरम्यान रेल्वे काळ बनून आली. याच दरम्यान ड्रायव्हरला रूळावर उभे असणारे लोक का नाही दिसले या प्रश्नावर ड्रायव्हरने जो खुलासा केला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

‘मला ट्रेन पुढे नेण्यासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता. सर्व मार्ग मोकळा आहे असे मला वाटले. रेल्वे रुळावर इतके लोक थांबले आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती असे’ या ड्रायव्हरने सांगितले.’ पुढे तो असेही म्हणाला, रावणदहनामुळे तिथे धुराचे प्रमाण खूपच होते. लाईटची सुविधाही काही खास नव्हती. कमी प्रकाशामुळे ड्रायव्हरला रूळावर उभे असणारे लोक दिसले नाहीत आणि ही दुर्घटना घडली.

याव्यतिरिक्त रेल्वे अधिकाऱ्यांचे हेच म्हणणे होते की, धुराचे प्रमाण जास्त असल्याने ड्रायव्हर काहीही पाहण्यास असमर्थ होता. इतकेच नाही तर रेल्वे नागमोडी वळणावर असल्याचेही त्यांनी सांगितले. रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आयोजक हे पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. दरम्यान आयोजक भूमिगत झाल्याची माहिती आहे.

रेल्वे प्रशासनाने जबाबदारी झटकली

रेल्वे प्रशासनाच असंही म्हणणं होतं की, रावणदहन पाहण्यासाठी लोकांनी रूळावर थांबणं हे सरळ सरळ अतिक्रमण करण्याचा प्रकार आहे. कोणताही कार्यक्रम रेल्वेच्या हद्दीत घ्यायचा असेल तर त्यासाठी रेल्वे प्रशासनाची रितसर परवानगी घ्यावी लागते. परंतु कालच्या घटनेत कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती असे म्हणत अमृतसर प्रशासनावर जबाबदारी ढकलत रेल्वे अधिकाऱ्यांनी अंग काढून घेतले.

हा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणलेला नाही : नवज्योतसिंग सिद्धू

अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ शुक्रवारी रात्री रावण दहनाच्या कार्यक्रमा दरम्यान घडलेली घटना दुर्देवी आणि दु:खद आहे. हा अपघात होता हे सर्वप्रथम आपल्याला समजून घेतले पाहिजे. निश्चित दुर्लक्ष झाले पण हे कोणी जाणीवपूर्वक हेतू किंवा उद्देशाने घडवून आणलेले नाही असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.