Train Ticket Booking | रेल्वेचे तिकीट मिळवणे झाले सोपे; ‘या’ वेबसाईटचा वापर करुन बुक करु शकता कन्फर्म तिकीट

पोलीसनामा ऑनलाइन – Train Ticket Booking | सध्या सण उत्सव सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकांचे बाहेर गावी जाणे देखील वाढले आहे. अशावेळी आपल्या देशात सर्वांत जास्त प्राधान्य हे रेल्वे प्रवासाला दिले जाते. झटपट आणि आरामदायी सेवेसाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) ओळखली जाते. मात्र अशा सणासुदीच्या वेळी रेल्वे तिकिट मिळवणे (Train Ticket Booking) हे मोठे अवघड होऊन बसते. अशावेळी कन्फर्म तिकीटसाठी खूप मशागत तर करावी लागते आणि सोबतच तात्काळ तिकीट देखील काढावे लागते. मात्र आता एका प्रोसेसमधून गेल्यास तात्काळ तिकीट (Instant Railway Ticket) काढणे आणि त्यामधून कन्फर्म काढणे देखील सोपे होणार आहे.

आता प्रवासासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकीट (Confirm Railway Ticket) व तात्काळ काढणे अगदी सहज झाले आहे. घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने (Online Train Ticket Booking) देखील तुम्ही हे काढू शकता. तात्काळ तिकीट काढण्यासाठी तुम्ही या वेबसाईटचा वापर केला तर इतरांपेक्षा लवकर तिकीट काढता येईल. एकदा तात्काळ तिकीट मिळाले की तुम्हाला कन्फर्म तिकीट सहज प्राप्त होणार आहे. यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटचा (IRCTC Official Website) वापर करता येणार आहे. IRCTC च्या वेबसाईटचा वापर करुन तात्काळ तिकीट काढता येते. फक्त या साईटवर लॉग इन करताना कोणत्या पद्धतीचे तिकीट हवे आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. जर AC तिकीट बुक करायचे असेल तर सकाळी 10 वाजल्यापासून तात्काळ तिकीट काढावे लागेल आणि जर NON AC तिकीट काढायचे असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून तात्काळ बुकिंग सुरु होते. हे रेल्वे तात्काळ तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर मास्टर लिस्ट (Master List) भरणे आवश्यक आहे. या लिस्टमध्ये अगदी साधी नाव, वय, पत्ता अशी माहिती भरावी लागणार आहे.

IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरुन तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी काही प्रोसेस आहे.
यामध्ये पहिल्यांदा तर अधिकृत वेबसाईटवरील ‘My Account’ वरील ‘My profile’ हा ऑप्शन सिल्केट करावा.
त्यामध्ये गेल्यानंतर Add/Modify Master List हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केले की लिस्ट समोर येईल.
त्यामधील ज्याचे तिकीट बुक करायचे आहे अशा प्रवाशाच्या डिटेल्स भराव्या. यामध्ये प्रवाशाचे नाव, नंबर, पत्ता, वय
अशी महत्त्वाचा तपशील भरावा. आणि त्यानंतर सबमिट करावे.
तिकीट बुकिंगच्या वेळी My Saved Passengers List असली तर बुकिंग हे कोणत्याही अडचणीशिवाय आणि पटकन
करता येते. यामुळे बुकिंगचा वेळ देखील वाचतो आणि तत्काळ तिकिटे मिळणे सोपे होते.
तसेच तिकीटाचे पैसे भरण्यासाठी देखील वेबसाईटवर पेमेंट ऑप्शन उपलब्ध आहे.
त्यामधील UPI हे ऑप्शन घेतले तर तिथल्या तिथे पैसे भरता येतात.
तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी (Train Ticket Booking), किमान 5 मिनिटे अगोदर IRCTC अॅप किंवा वेबसाइट
उघडून आपले लॉग इन करुन ठेवावे आणि सोबतच मास्टर लिस्ट आधीपासूनच तयार ठेवावी. या पद्धतीचा वापर केल्यास रेल्वे तिकीट बुक करणे अगदी सोयीचे आणि सहज होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kartikey Malviya – Ragini | अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित!