एक झाड कापल्याने १०० घरटी उध्वस्त ! बेघर पक्षांची ‘केविलवाणी’ अवस्था पाहून तुम्हीही व्हाल ‘भावुक’ (व्हिडिओ)

पलक्कड (केरळ) : वृत्तसंस्था – पर्यावरणाचा आणि पशुपक्षांचा विचार न करता विकासकामांसाठी सरकार अनेकवेळा बेछूट वृक्षतोड करता असते. जंगलातील दोन हजार झाडे तोडण्यावरून मुंबईतील ‘आरे’ चा वादही चांगलाच पेटला असून केरळमध्येही एक असेच प्रकरण उघडकीस आले आहे ज्यामध्ये वनविभागाची परवानगी न घेता पलक्कड रेल्वे स्टेशन परिसरातील एक झाड कापण्यात आलं ज्यामुळे त्या झाडावरील १०० पेक्षा जास्त घरटी तुटल्याचे त्यांचा निवारा हिरावला गेला आणि पक्षांना प्राण देखील गमवावे लागले.

असे आहे प्रकरण :
दरम्यान, या बेकायदेशीर कृतीमुळे रेल्वे अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पलक्कड रेल्वे स्टेशन परिसरात असणारं गुलमोहराचं झाड १ ऑक्टोबर रोजी कापण्यात आलं. वास्तविक पाहता नियमानुसार, पक्षांच्या प्रजनन काळात कोणतंही झाड कापण्यापूर्वी वनविभागाला त्याची माहिती द्यावी लागते आणि परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर वन विभाग झाड आणि संबंधित ठिकाणाचे निरीक्षण करते आणि झाडावर पक्ष्यांचे घरटे किंवा अंडी नाहीत याची खात्री करूनच परवानगी दिली जाते.मात्र संबंधीत अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही प्रक्रिया केली नव्हती.

पक्षांची अवस्था केविलवाणी :
बऱ्याच जुन्या असलेल्या या गुलमोहराच्या झाडावर १०० पेक्षा जास्त पक्षांची घरटी होती. मात्र जात कापल्यानंतर घरटी तुटून अंडीही फुटली. झाड तुटल्यानंतर पक्षांची मात्र केविलवाणी अवस्था झाली होती. ते दोन दिवस तेथेच थांबून घरट्यांत काहीतरी शोधात होते. दरम्यान, ही घटना पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती देत वनाधिकाऱ्यांना पाचारण केलं. त्यानंतर वनविभागाने संबंधित ठेकेदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करत कारवाई सुरु केली.

Visit : Policenama.com