मुलांवर होणार कोरोना व्हॅक्सीनची ट्रायल, साईड इफेक्ट झाला तर काय होणार?, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात मुलांच्या कोरोना व्हॅक्सीन ट्रायलला परवानगी मिळाली आहे. 12 मे रोजी देशाचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची शिफारस स्वीकारली आहे आणि भारत बायोटेकची कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीनच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या क्लिनिकल ट्रायलला परवानगी दिली आहे. ही क्लिनिकल ट्रायल 2 ते 18 वर्षाच्या वयोगटात केली जाईल.

या ट्रायलचा हेतू काय आहे आणि किती वेळ लागेल? यावर एम्समध्ये कम्युनिटी मेडिसिनचे डॉक्टर आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचे एम्समधील ट्रायलचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय यांच्याशी केलेली ही विशेष चर्चा…

प्रश्न – व्हॅक्सीनची ही ट्रायल का केली जात आहे आणि यातून काय समजणार?

उत्तर –  मुलांमध्ये व्हॅक्सीन सुरक्षित आहे किंवा नाही तसेच परिणामकारक आहे किंवा नाही याची माहिती नाही. आज आवश्यकता नाही परंतु उद्या गरज भासल्यास मॉडिफिकेशनसह व्हॅक्सीन लाँच करता येऊ शकते. यासाठी इव्हिडन्स जनरेट करण्याची आवश्यकता होती परंतु त्या इव्हिडन्सचा सदुपयोगी होण्याची आवश्यकता आहे. धोकादायक स्ट्रेनमुळे मुलांसाठी कधीही धोका उत्पन्न होऊ शकतो.

प्रश्न – फेज 2 आणि 3 मधून काय समजणार?

उत्तर –  हे दोन्ही एकच असते. फेज 2 मध्ये इम्मुनो जेन्सिटी पाहिली जाते की, अँटीबॉडी तयार होत आहे का, आणि किती तयार होत आहे. पहिल्या टप्प्यात सुरक्षा पाहिली जाते. ती प्रत्येक फेजमध्ये पाहिली जाते. जसे मोठ्यांसाठी केले होते. तेच प्रिन्सिपल येथे असते.

प्रश्न – या ट्रायलमध्ये मुले आहेत, यामध्ये किती वेळ लागेल?

उत्तर –  तसाच जसा मोठ्यांसाठी लागला होता. दोन डोसचे शेड्यूल, त्यानंतर त्याचे परिणाम पहिले जातील, तर यामध्ये किमान 6 महीन्यांचा वेळ लागेल.

प्रश्न –  मुलांना काही त्रास झाला तर कदाचित ते सांगूही शकणार नाहीत, त्या स्थितीत काय करणार?

उत्तर –  सर्वांचे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहेत. जे फॉलो करावे लागतात. मोठ्यांप्रमाणेच रेग्युलर फॉलोअप असतो. याचा उद्देशच हा आहे की कोणताही अ‍ॅडव्हर्स इव्हेंट झाला तर त्यास डॉक्यूमेंट करणे आणि त्यास प्रॉपर्ली अड्रेस करणे. तिच प्रक्रिया येथे लागू होईल. व्हॅक्सीन दिल्यानंतर त्यांचा फॉलोअप होईल. काही अडचण झाली तर डॉक्यूमेंट केले जाईल तेव्हाच तर सांगता येऊ शकते की, कशाप्रकारे साईड इफेक्ट होत आहेत, किती पर्सेंट आहे ते सर्व या क्लिनिकल ट्रायलमधून समजेल.