Tulip Garden : 64 पेक्षा जास्त प्रकारची 15 लाख फुलं करत आहेत तुमची प्रतिक्षा, पहा स्वर्गाची छायचित्रे (Video)

श्रीनगर : वृत्तसंस्था – जगभरात प्रसिद्ध श्रीनगरचे ट्यूलिप गार्डन सामान्य लोकांसाठी खुले केले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा या गार्डनचे दृष्य असे आहे, जणू काही आपण स्वर्गातच फिरत आहोत. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गुरूवारी 4 दिवसानंतर उन पडले आणि हवामान आनंददायी झाले. यामुळे श्रीनगरचे प्रसिद्ध ट्यूलिप गार्डन जनतेसाठी खुले झाले आहे.

ट्यूलिप गार्डनमध्ये 64 पेक्षा जास्त प्रकारची 15 लाख ट्यूलिप फुले उमलली आहेत. इतर प्रजाती जसे की हायएसिन्थ्स, डॅफोडिल्स आणि रेनकुलसची हजारो फुले सुद्धा ट्युलिप गार्डनमध्ये उमलली आहेत. महामारीमुळे संपूर्ण एक वर्ष प्रभावित झालेल्या या पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासित प्रदेशाच्या पर्यटन विभागाकडून गुरुवारपासून ट्यूलिप उत्सव साजरा केला जात आहे.

दरम्यान, श्रीनगरमध्ये किमान तापमान 4.7 डिग्री सेल्सियस, पहलगाममध्ये मायनस 1.5 आणि गुलमर्गमध्ये मायनस 3.5 डिग्री सेल्सियस होते. तर, लडाखच्या लेह शहरात रात्रीचे किमान तापमान मायनस 1.4, कारगिलमध्ये मायनस 2.9 डिग्री आणि द्रासमध्ये मायनस 10.8 डिग्री नोंदले गेले आहे.

जर तुम्ही गार्डनला भेट देण्याचा विचार करत असाल तर तेथील तापमान जाणून घ्या. जम्मू शहरात किमान तापमान 12.7 डिग्री, कटरामध्ये 11.7, बटोटेमध्ये 5.9, बनिहालमध्ये 6.2 आणि भद्रवाहमध्ये 2.7 डिग्री नोंदले गेले आहे.