Video : ‘कोरियोग्राफर’ पुनीत पाठकच्या लग्नाच्या कार्यक्रमात ‘भारती-हर्ष’चा जोरदार डान्स !

पोलीसनामा ऑनलाइन – फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि अ‍ॅक्टर पुनीत पाठक (Punit Pathak) सध्या आपल्या लग्नामुळं चर्चेत आहे. अलीकडेच पुनीतनं त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड निधी मुनी (Nidhi Muni) सोबत साखरपुडा केला. पुनीतच्या लग्नाच्या कार्यक्रमांमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात कॉमेडीयन भारती सिंह (Bharti Singh आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) जोरदार डान्स करताना दिसत आहेत. अनेक सेलेब्सही या कार्यक्रमात उपस्थित आहेत.

पुनीतनं त्याच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. लग्नाच्या विधींमधील हे फोटो आणि व्हिडीओ आहेत. यातील एका व्हिडीओत भारती आणि हर्ष एका गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. भारती आणि तिचा पती हर्ष खूप आनंदी दिसत आहेत. आणखी एका फोटोत पुनीत आणि निधी खूप हसताना दिसत आहेत.

भारती आणि हर्षचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. काहींनी तर या कपलच्या डान्सचं खूप कौतुक केलं आहे.