अभिनेत्री रश्मी देसाईचं आयुष्य ‘चढ-उतारां’ नी भरलेलं, गरिबीतून बाहेर पडत आज ‘कोट्याधीश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 ची स्पर्धक रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मी बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिची पर्सनल लाईफ पब्लिक समोर आली होती. तिच्या आयुष्यात खूप चढ उतार आले आहेत. प्रोफेशनल लाईफच नाही तर पर्सनल लाईफमध्येही तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. आज रश्मी आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिसकॅरेज, घटस्फोट ते अरहान खानसोबत नातं अशा तिच्या लाईफबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

https://www.instagram.com/p/B8bnaHTgnGb/

घरची गरिबी असल्यानं रश्मी देसाईनं खूपच कमी वयात करिअरला सुरुवात केली होती. भोजपुरी सिनेमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर टीव्ही मालिका करण्यासाठी तिनं भोजपुरी सिनेमा सोडला. 2008 साली आलेल्या परी हूं मैं या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. यानंतर ती मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करू लागली. सध्या ती बिग बॉस 13 मध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B70xEBmgXnq/

रश्मीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिचा उतरन मालिकेतील कोस्टार नंदिश संधू यांच्यात जवळीकता वाढू लागली होती ज्याची खूप चर्चा होती. यानंतर रश्मी आणि नंदिश यांनी गुपचूप लग्न केलं होतं. परंतु हे नातं जास्त दिवस टिकलं नाही. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान रश्मीनं मिसकॅरेजचाही खुलासा केला होता. त्याच्या फ्लर्टी नेचरला तिनं घटस्फोटाचं कारण सांगितलं होतं. इतकेच नाही तर तो ओव्हर पजेसिव होता असंही तिनं सांगितलं होतं.

https://www.instagram.com/p/B7iC2_Ygl1h/

रश्मी 2018 साली सर्वाधिक कमाई करणारी टीव्ही अ‍ॅक्ट्रेस होती. रावण या मालिकेतून रश्मीनं टीव्ही मालिकेच्या करिअरला सुरुवात केली होती. रश्मी बिग बॉसमध्ये सर्वाधिक फी घेणारी स्पर्धक आहे.

https://www.instagram.com/p/B7QZUtxgRoN/